HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी

मुंबई। मराठा आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली. आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊन तो कायदा लागू करण्यात आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

आरक्षणामुळे मराठा समाजाला काय काय मिळणार?

– शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण

– राज्याच्या लोकसेवांमधील पदांवर आणि प्रवेश नियुक्त्यांमध्ये 16 टक्के राखीव जागा

– विशेष प्रवर्ग तयार करुन मराठ्यांना आरक्षण

– अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था वगळून इतर शैक्षणिक संस्था, अनुदानित आणि विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या 16 टक्के आरक्षण

– राज्याच्या नियंत्रणाखालील आणि पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांमध्ये 16 टक्के आरक्षण

मराठा आरक्षण विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी

-अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळून इतर शैक्षणिक संस्था, अनुदानित किंवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या 16 टक्के आरक्षण

– राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील आणि पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांच्या 16 टक्के आरक्षण

– ग्रामपंचायती ,पंचायत समित्या ,जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिका निवडणुकांसाठी जागांचा आरक्षण अंतर्भाव असणार नाही

– मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे सर्व सेवा भरतीत शैक्षणिक पात्रतांचा दर्जा कमी करणार नाही, त्यामुळे कार्यक्षमता बाधित होणार नाही

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात काहीही नवे घडले की माझ्याच नावाची चर्चा !

News Desk

… म्हणून अजित पवारांचा कोल्हापूर दौरा रद्द!

News Desk

प्रश्न विचारणे सोपे असते, त्याला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Aprna