HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपाल भाजप नेत्यांना भेटले, पण महाविकासआघाडीच्या नेत्यांसोबतची भेट टाळली ?

मुंबई । सातत्याने वाढणाऱ्या अडचणी, आक्रमक विरोधी पक्ष आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत असलेला सततचा संघर्ष यामुळे महाविकासआघाडी सरकारच्या कोंडीत मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. विरोधकांसोबत भेट झाल्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांशी भेटणे राज्यपालांनी टाळले आहे. खरंतर, राज्यपाल कोश्यारी यांची विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळासोबत काल (२४ मार्च) भेट झाली होती. मात्र, राज्यपाल आता मुंबईत नाहीत. ते देहरादून दौऱ्यावर आहेत. त्यामुळे, महाविकासआघाडीच्या नेत्यांसोबतची भेट राज्यपालांनी टाळल्याचे म्हटले जात आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील नेते आज (२५ मार्च) राज्यपालांची भेट घेणार होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली होती. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईत नसल्याने ही भेट टळणार आहे. राज्यपाल कोश्यारी आजपासून २८ मार्चपर्यंत देहरादून येथे असणार आहेत. दरम्यान, राज्यपालांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. ते २८ मार्चला मुंबईत परततील असे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, त्यामुळे विरोधकांची भेट घेतल्यानंतर सत्ताधारी नेत्यांसोबत राज्यपालांची भेट होऊ शकणार नाही.

महाविकासआघाडी सरकार मोठा अडचणीत सापडले आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बुधवारी (२४ मार्च) भेट घेतली आहे. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात तब्बल १०० तक्रारी भाजपकडून राज्यपालांना देण्यात आल्या आहेत. त्याचसोबत, मुख्यमंत्र्यांच्या मौनावर सवाल विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. “मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवून घ्यावा. राज्यपालांना तो अधिकार आहे”, असेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजच्या वटपौर्णिमा सणानिमित्ताने जाणून घ्या… व्रतकथा, महत्व अन् मुहूर्त

News Desk

शिवसेना राष्ट्रपती राजवटीविरोधात सर्वोच्च न्यायालयात, कपिल सिब्बल बाजू मांडणार ?

News Desk

मंत्री धनंजय मुंडेंकडून राजीनामा घ्यावा, शरद पवारांकडून हीच नैतिकता अपेक्षित ! | चंद्रकांत पाटील

News Desk