HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपाल स्पाईसजेटच्या विमानाने उत्तराखंडला रवाना

मुंबई | राज्य सरकारने सरकारी विमानाने प्रवास करण्याला परवानगी नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले. स्पाईसजेट कंपनीच्या विमानाने राज्यपाल कोश्यारी मुंबईहून डेहराडूनला रवाना झाले. राजभवनाच्या पीआरओकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यपालांना राज्य सरकारकडून परवानगी नाकारल्याने भाजपकडून टीका करण्यास सुरुवात झाली आहे. तर महाविकासआघाडी सरकारच्या काही नेत्यांकडून असं म्हटलं जात आहे की तांत्रिक बिघाडामुळे राज्यपालांना विमानातून खाली उतरावे लागले होते.

दरम्यान, राज्यपाल कार्यालयाने आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. राज्यपाल सरकारी विमानाने मसुरीला जाणार होते. मात्र शेवटपर्यंत त्यांना परवानगी मिळाली नाही. महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली. दुपारी सव्वाबारा वाजताच्या खासगी विमानाने राज्यपाल कोश्यारी उत्तराखंडला रवाना झाले. दुपारी सव्वा दोन वाजता ते डेहराडूनला पोहोचतील.

राज्यपाल उत्तराखंडला का निघाले होते?

राज्यपालांना उत्तराखंडमधील मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जायचं होतं. परंतु सरकारी विमानाने प्रवासाची परवानगी न मिळाल्याने अखेर राज्यपाल आणि त्यांचा खासगी स्टाफ स्पाईसजेटच्या विमानाने रवाना झाले. मात्र सरकारी विमान नाकारल्याने पुन्हा राजकीय वादंग माजला आहे.

इगो असलेलं सरकार, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

राज्यपालांना विमान नाकारणं हा प्रकार दुर्दैवी आहे. कुणाच्या मालकीची ही मालमत्ता नाही. माझ्या माहितीप्रमाणे जीएडीला पत्र दिलं होतं. तसंच मुख्यमंत्री कार्यालयाकडे हे पत्र पोहोचलं होतं पण तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात एवढं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं. आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेत्यांनी आपण काय करत आहोत याचे भान सोडू नये

News Desk

Tauktae Cyclone | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर, रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील नुकसानाची करणार पाहणी

News Desk

आमची सत्ता आली तर मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू !

News Desk