HW News Marathi
महाराष्ट्र

पदवीधर निवडणूकीत राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण

पुणे | राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आज (१२ नोव्हेंबर) आहे. उद्या (१३ नोव्हेंबर) आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख १७ नोव्हेंबर आहे.

पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अरुण अण्णा लाड यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. अरुण अण्णा लाड हे क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. तसेच स्वातंत्र्य सैनिक – क्रांतीअग्रनी स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांचे पुत्र आहेत. राष्ट्रवादीकडून अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे. कारण, राष्ट्रवादी समर्थक प्रताप माने यांनीही पुणे पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

तर,भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला आहे. त्यामुळे भाजपची देखील बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली असतानाच राष्ट्रवादीच्या अडचणीत देखील भर पडत आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचेच कट्टर समर्थक असलेल्या शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र, आता मुंडे समर्थकांनी केलेल्या डबल बंडखोरीचा भाजपला मोठा धक्का बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या ‘या’ तीन उमेदवारांमध्ये रस्सीखेच

Aprna

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी देणार! – मुख्यमंत्री

Aprna

अखेर मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

News Desk