HW News Marathi
महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात आकडेवारीवरुन सेना-भाजपमध्ये आगपाखड

मुंबई | राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांचा धुरळा सुरु आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, भाजप प्रत्येक पक्ष आल्या जागा राखण्यात यशस्वी झाल्या आहेत. काही ठिकाणी अपयश आले असले तरी प्रत्येक पक्ष आपली आकडेवारी सांगताना दिसत आहे. कुणी कितीही दावा केला असला तरी माझ्याकडे आकडेवारी आहे. आम्ही राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे सुमारे सहा हजार ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, असा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. राज्यातील १६०० बिनविरोध ग्रामपंचायींपैकी आम्ही ५८० ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्या आहेत. त्या वगळता आम्ही 6 हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. गडचिरोली आणि इतर ग्रामपंचायतीचे निकाल यायचे बाकी असून त्यातही भाजपला घवघवीत यश मिळेल, असा दावा उपाध्ये यांनी केला आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपा व शिवसेनेसह महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असे दोन्ही गट आपण पहिल्या स्थानावर असल्याचा दावा करत आहेत. शिवसेना हा या निवडणुकांमध्ये ३,११३ जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून, महाविकास आघाडीही भाजपच्या पुढे असल्याचे शिवसेनेनं म्हटलं आहे. मात्र, भाजपाची अवस्था गिरे तो भी टांग उपर असल्याची टिप्पणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी केली आहे. दुसरीकडे आपण पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा भाजपानं केला आहे. निकाला संदर्भातील आकडेवारी भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शिवसेनेनं दिलेल्या माहितीनुसार १२,७११ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं ३ हजार ११३ जागा जिंकल्या असून, सर्वाधिक जागा जिंकणारा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपनं २ हजार ६३२ जागा जिंकल्या असून, दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी २४०० जागांसह तिसऱ्या क्रमाकावर आहे. काँग्रेसनंही राज्यात १८२३ जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ३६ जागी विजय मिळविला आहे. तर २ हजार ३४४ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या काँग्रेसच्या जागापेक्षा अधिक आहे.

तर भाजपाच्या सांगण्यानुसार, निकालाचं चित्र पुढील प्रमाणे आहे.

मतदान झालेल्या एकूण ग्रामपंचायती : 12,711

आतापर्यंत हाती आलेले निकाल : 7233

भाजपा : 3131 (44 टक्के)

एकूण सदस्यांच्या जागा : 1,25,709

बिनविरोध : 26,718

आतापर्यंत हाती आलेले निकाल : 44,887

भाजपा : 18629 (42 टक्के)

विदर्भातील ग्रामपंचायत निकाल

चंद्रपूर : एकूण 604/भाजपा : 344

गोंदिया : एकूण 181/भाजपा : 106

भंडारा जिल्हा : एकूण : 145/भाजपा: 91

वर्धा जिल्हा : एकूण : 50/भाजपा : 29

नागपूर जिल्हा : एकूण 127/ भाजपा : 73

वाशीम जिल्हा : एकूण 152/भाजपा : 83

अकोला जिल्हा : एकूण 214/भाजपा : 123

बुलढाणा जिल्हा : एकूण 498/भाजपा : 249

अमरावती जिल्हा : एकूण 537/भाजपा : 113

यवतमाळ जिल्हा : एकूण 925/भाजपा 419

(गडचिरोलीतील 170 जागांवर मतमोजणी 22 जानेवारी रोजी)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांचा शिवसेनेला टोला ‘करून दाखवले’

News Desk

विधीमंडळाचे आजपासून २ दिवसीय हिवाळी अधिवेशन !

News Desk

दारुड्यांचा हल्ल्यात जखमी झालेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णींची चौकशी केल्याबद्दल सर्वांचे मानले आभार

News Desk