HW News Marathi
महाराष्ट्र

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाणेकरांना कोरोना निर्बंधांचं पालन करण्याचं आवाहन!

ठाणे। कोरोना या महामारीच्या निर्बंधांमुळे गोकुळाष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत ‘आरोग्य उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज ठाणे शहरातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

ठाण्यातील प्रकल्पाचे लोकार्पण

यावेळी नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार सरनाईक यांच्या वतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी मीरा भाईंदर येथे पहिल्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तर आज ठाण्यातील प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

=19

गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी मदत होईल

एकनाथ शिंदे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची सर्वांधिक गरज भासली. उत्पादनापेक्षा मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र जिल्हा नियोजन विकास निधी आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसरातील महापालिकांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे पीएसए प्लांट उभारले आहेत. त्यामाध्यमातून गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी मदत होईल. सध्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत असल्याचे सांगत संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही

दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची जाणीव आहे. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांच्या यादीतून ‘ही’ नावे वगळण्याची शक्यता?

News Desk

#Coronavirus : संचारबंदीचे उल्लंघन, पोलिसांकडून १२२ जणांवर गुन्हे दाखल

swarit

INS विक्रांत कथित घोटाळ्या प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 14 जूनला सुनावणी

Aprna