HW News Marathi
Covid-19

कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना

मुंबई | राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत सर्वसामान्यांसाठी कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर, टास्क फोर्स ऑन आयुष्य फॉर कोविड-१९ गठीत करण्यात आला होता. त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय तसेच अलक्षणिक रुग्णांवरील उपचारासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.

सामान्य प्रतिबंधात्मक उपाय:

१. वैयत्तिक स्वच्छतेचे पालन करणे.

२. वारंवार साबणाने हात २० सेकंदापर्यंत धुणे

३. खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा

४. ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा.

५. जिवंत प्राण्यांशी संपर्क व कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा.

६. पशुपालन गृह तसेच जिवंत पशु विक्री केंद्र किंवा कत्तलखाने या ठिकाणी प्रवास टाळावा

आयुष उपाययोजना पुढीलप्रमाणे

१. ताजे, उष्ण व पचायला हलके भोजन घ्यावे. भोजनात अख्खी आणि ऋतूनुसार भाज्यांचा समावेश असावा

२. तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.

३. सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.

४. कोविड-१९ लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, आले आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत.

५. थंड, फ्रिज मध्ये ठेवलेले व पचायला जाड असलेले पदार्थ टाळावे.

६. थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळावा.

७. विश्रांती व वेळेत झोप हितकारक आहे.

८. प्रशिक्षित योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम करावे.

९. मुगाचे कढण / सूप / पाणी – मुगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सूप / पाणी प्यावे, ते पोषक आहे.

१०. सुवर्ण दुग्ध / दुग्ध – १५० मिलीमीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी व रोग प्रतिबंधासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी

१. संशमनी वटी १ गोळी दिवसातून दोनदा असे १५ दिवस

२. तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करणे. वरील औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण १०० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवणे व नंतर हे पाणी पिणे.

३. च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करणे (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करावे.

४. सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेलतेल किंवा हे बोटाने लावावे.

५. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.

युनानी औषधी

१. बिहिदाना ५ ग्रॅम, बर्गे गावजबान ७ ग्रॅम, उन्नाब ७ दाने, , सपिस्तान ७ दाने, दालचिनी ३ ग्रॅम, बनपाशा ५ ग्रॅम यांचा काढा करून २५० मिलिलिटर पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळावे व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा २ वेळा १५ दिवसांकरिता घ्यावे.

२. खमीरा मरवारीद दुधासोबत ५ ग्रॅम दिवसातून दोनदा घ्यावे. मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.

होमिओपॅथी औषधी

१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.

कोविड-१९ सारखी लक्षणे असणाऱ्या इतर आजारासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी

१. टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम) दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे

२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.

३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी नाकपुडीत टाकणे.

४. ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावी.

५. खोकला व घास खवखवत असल्यास साखर अथवा मध यामध्ये लवंग चूर्ण मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.

युनानी औषधी

१. अर्धा ग्लास पाण्यामध्ये आरके अजिब ५ थेंब मिसळून गुळण्या कराव्यात, असे १५ दिवस करावे.

२. तिर्यक अर्बा – हब्बूल घर, ज्यूतिआना, मूर झरवंद तविल या सर्व घटकांचे चूर्ण तयार करून तुपामध्ये परतावे व मध गरम करून त्यामध्ये ही औषधे मिसळावीत. याचा वापर चूर्ण स्वरूपातही करता येतो, हे औषध १५ दिवस घ्यावे.

होमिओपॅथिक औषधी

१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.

२.तसेच ब्रायोनिया अल्वा, हस टॉक्सिको डेन्ड्रॉन, बेलॉडोना जेलसेमियम, युप्याटोरियम, परफॉलीएटम ही औषधे देखील सर्दी खोकला, फ्लू समान रोगांमध्ये चिकित्सेसाठी उपयुक्त्त ठरली आहेत.

(उपरोक्त सर्व औषधे तज्ञ आयुर्वेदिक , युनानी आणि होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावीत )

कोविड-१९ पॉझिटिव्ह, अलक्षणिक, चिकित्सालयीन तपासणीनुसार स्थिर असणाऱ्या व इतर वर्तमान गंभीर व्याधीरहित रुग्णांकरिता प्रस्थापित चिकित्सेला पूरक आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी

१. टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम) दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे किंवा टॅबलेट सुदर्शन घनवटी – २५० मिलिग्रॅम दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे.

२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.

३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी व संध्याकाळी नाकपुडीत टाकणे.

४. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.

५. गरम पाण्याची वाफ दोनदा किंवा तीनदा घ्यावी.

होमिओपॅथिक औषधी

१.कोविड -१९ समान रोगांच्या लक्षणांच्या चिकीत्सेकरिता नमूद औषधांचा वापर हा प्रस्थापित चिकीत्सेस पूरक चिकित्सा म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व औषधे तज्ञ आयुर्वेदिक व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावे.

कोविड -१९ या संसर्गजन्य आजाराची लक्षणे जाणविल्यास तात्काळ चाचणी करून घेणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक राहील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना २४ तासांत ३ वेळा फोन, राज्यात ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती चिंताजनक!

News Desk

‘सिल्व्हर ओक’नंतर पवारांच्या गोविंद बागेतही ‘कोरोना’चा शिरकाव, चौघांना लागण

News Desk

पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर…!; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश

News Desk