HW News Marathi
Covid-19

मुंबईकरांनो आता मॉलमध्ये जाण्यासाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट लागणार!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत पुन्हा एकदा चिंताजनक वाढ झाली असून, वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून तातडीने उपाययोजना लागू केल्या जात आहेत. एकिकडे निर्बंध लागू केलेले असताना महापालिकेकडून चाचण्यांवर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई महापालिकेनं आता गर्दीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील सर्व मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांची चाचणी करणे सक्तीचे केलं आहे.

मॉलमध्ये प्रवेश करण्याआधी ग्राहकांच्या अँटिजेन चाचण्या केल्या जाणार आहेत.काकाणी यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितलं, की हे नवे नियम सोमवारपासून लागू करण्यात येणार आहेत. शॉपिंग मॉलशिवाय मॉलमध्ये असणाऱ्या चित्रपटगृहांसाठीही हे नियम लागू असणार आहेत.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली आहे. मुंबई शहरात करोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. २२ मार्चपासून सर्व मॉल्ससाठी स्वॅब संकलन केंद्र सक्तीचे करण्यात आलं आहे. यासाठी मॉलच्या प्रवेशद्वारावरच पथक नियुक्त केलं जाणार असून, याची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल असं,” अशी माहिती काकाणी यांनी दिली.

लक्षणं नसलेल्या रुग्णांना शोधणं खूप अवघड काम आहे. अशी व्यक्ती जर मॉल वा इतर गर्दीच्या ठिकाणी गेली, तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे आता मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लोकांनी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा किंवा स्वॅब देणे सक्तीचं असणार आहे,” असं काकाणी यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयातही कोरोनाचा शिरकाव, न्यायाधीशांनी निवडला ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय

News Desk

लॉकडाऊन हवा की नको ? लोकांनीच ठरवावं ! – मुंबई महापौर

News Desk

घरातून बाहेर पडताना ओळखपत्र सोबत ठेवा – पोलिसांच्या नागरिकांना सूचना

News Desk