मुंबई | वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण झाल्यानंतर वाद अजून चिघळला आहे. या प्रकरणी वाराणसी सत्र न्यायालयात आज (१७ मे) सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने अधिवक्ता-आयुक्त अजय कुमार मिश्रा यांना सर्वेक्षण समितीमधून हटवण्यात आले आहे. तसेच इतर दोन कोर्ट कमिशरांना अहवाल सादर करण्यासाठी २ दिवसांची मुदत वाढ आज (१७ मे) पार पडलेल्या सुनावणी दरम्यान दिली आहे.
दरम्यान, सर्वेक्षण समितीने तीन दिवसात हजारो फोटो आणि व्हिडिओग्राफी स्वरुपात पुरावे गोळा करण्यात आले होते. हे सर्व पुरावे न्यायालयात कमिश्नर हे पुरावे सादर करण्यात येणार होते. परंतु, याचा अहवाल अद्याप पूर्ण झाल्या नसल्याने ते पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांची मुदत वाढ मागितली होती. त्यानुसार वाराणसी न्यायालयाने त्यांनी ती मुदत वाढ दिली होती. न्यायालयात आज दोन याचिकांवर सुनावणी झाली आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी आधी मंदीर असल्याचा दावा काही हिंदुत्ववादी संघटनांनी न्यायालयात केला होता. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर त्यांनी मशिदी परिसराचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. यानंतर मशीद परिसराचे तीन दिवस सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले होते. पंरतु, कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांनी सर्वेक्षणातील काही माहिती माध्यमांना दिल्याचे उघड झाले. यामुळे न्यायालयाच्या अहवाल गोपीनयतेचा भंग झाल्याची चर्चा रंगल्या होत्या. यामुळे न्यायालयाने मिश्रांना हटवले.
Gyanvapi mosque survey | Advocate-Commissioner Ajay Kumar Mishra removed from his post appointed by the court.#UttarPradesh
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 17, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.