HW News Marathi
महाराष्ट्र

जाधव पती – पत्नीला औरंगाबादमध्ये धक्का, दोघांच्याही पॅनेल्सना पराभवाची धूळ चाखावी लागली

औरंगाबाद | माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव या पती पत्नीचा दारुण पराभव झाला. औरंगाबादमधील पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या या दोघांच्याही पॅनेल्सना पराभवाची धूळ चाखावी लागली. महाविकास आघाडीने हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचा धुव्वा उडवला. पर्यायाने राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवणारे हर्षवर्धन जाधव यांचे सुपुत्र आदित्य जाधव यांनाही मोठा धक्का बसला आहे.

पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलला १७ पैकी ४ जागा मिळाल्या, तर संजना जाधव यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीने तब्बल ९जागांवर विजय मिळवला. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.

औरंगाबादमधील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या राजकीय संन्यासानंतर त्यांचा नवा वारसदार कोण, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. आधी जाधव यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव यांच्याकडे समर्थकांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर चित्र पालटलं. रिंगणात उडी घेत हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्य जाधवने कन्नडमधील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली होती.

हर्षवर्धन जाधव यांच्याच गावांमध्ये पत्नी संजना जाधव यांनी स्वतःचं एक पॅनल उभं केलं. हर्षवर्धन जाधव यांना सुरुवातीला उमेदवाराची शोधाशोध करावी लागल्याने ग्रामपंचायतीच्या राजकारणातून ते बाद होणार का, अशी चर्चा होती. मात्र त्यांच्या मुलाने ऐनवेळी एन्ट्री घेत रंगत वाढवली होती. आता या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र त्यांना जोरदार धक्का बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्या.” – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Chetan Kirdat

“महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत”

News Desk

शेतकऱ्याचा मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न…

News Desk