HW News Marathi
महाराष्ट्र

ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शन १७ जानेवारीला

मुंबई | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (१४ जानेवारी) मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत गामविकास विभागाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योदनांबद्दल सखोल माहिती मुश्रीफ यांनी दिली. या विभागाच्या अंतर्गत अनेक योजना राबविण्यात येतात त्यातील महत्त्वाचे अभियान म्हणजे ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेषत: जिवनोन्नती अभियान राबवण्यात येते. या अभिनयाअंतर्गत ३४ जिल्हे व ३५१ तालूके एकत्र काम करत आहेत. या अभियानांतर्गत निर्माण करणायात आलेल्या स्वयं सहाय्यता गटांच्या उत्पादनांस हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महासक्ष्मी सरसचे आयोजन केले जाते.

तसेच महालक्ष्मी सरसचा माध्यमातून ग्रामीण महिला स्वयं-सहाय्यता गटांना साहित्य, नाविन्यपुर्ण कला व खाद्य पदार्थ शहरी भागात विकता यावे यासाठी दरवर्षी प्रदर्शन भरवले जाते आणि मागील वर्षी या प्रदर्शनाच्या माध्यमातून १२ कोटींची कमाई या महिलांनी केली होती. यावर्षी १७ जानेवारीला हे प्रदर्शन आयोजित केले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल.

हसन मुश्रीफ यांच्या परिषदतेतील महत्त्वाचे मुद्दे –

-महिलांसाठी दरवर्षी जिवनोन्नती अभियान राबविले जाते.

-महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून प्रदर्शने भरवली जातात.

-गेल्या वर्षी प्रदर्शनातून १२ कोटींची कमाई

-१७ जानेवारीला महालक्ष्मी सरसचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील १३ विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईनच होणार – उदय सामंत

News Desk

तो पर्यंत अच्छे दिन येणार नाहीत !   

News Desk

परळी महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक; नायब तहसीलदारांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन!

News Desk