HW News Marathi
महाराष्ट्र

मुलांनी आईची केली हत्या ?

मुंबई पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर गनोरे यांच्या मुलानेच स्वताच्या आईची हत्या केली आहे असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र वाकोला पोलिसांनी या घटनेचा इंकार केला असून अध्याप तपास सुरू असल्याच सांगितलं आहे.

वाकोला येथे पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर गनोरे यांच्या पत्निची राहत्या घरी हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर गनोरे सांताकृज पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

ज्ञानेश्वर गनोरे हे सांताकृज पोलिस ठाण्यातून रात्री घरी आले. घरचा दरवाजा बंद होता ज्ञानेश्वर यांनी पत्नीच्या मोबाईलवर कॉल केले असता मोबाईल बंद येत होता. ज्ञानेश्वरनी यांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात आढळला आहे. ज्ञानेश्वर यानी लगेच 100 नंबरवर कॉल करून पोलिसांना माहीती दिली. पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेऊन दीपाली मनोरे यांना तातडीने व्ही एस दसाई रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरने मृत घोषीत केलं.याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे. अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते 20 शाखांचे अनावरण

News Desk

मुंबईतील रस्ते सुधारणा कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna

नारायण राणेंच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!

News Desk