HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई राजकारण

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

मुंबई | राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे”, असे ट्विट हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

 

दरम्यान, आज राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी देखील स्वतः ही माहिती दिली आहे. ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

Related posts

संभाजी भिडे यांचे मुंबईतील व्याख्यान रद्द करण्याची भीम आर्मीची मागणी

News Desk

#LokSabhaElections2019 : राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर

News Desk

तर पोलीस महासंचालक नक्कीच बिहारचे गृहमंत्री असतील, जितेंद्र आव्हाडांची टीका 

News Desk