HW News Marathi
महाराष्ट्र

“चंद्रकांतदादा मला विकावं लागलं असं म्हणत असले तरी त्यांची माया कुठंय हे मला ठाऊक आहे”

कोल्हापूर | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील वाद सगळ्यांनाच माहित आहे. अनेक विषयांवरुन या दोघांमध्ये कुरघोडी सुरुच असते. आताही पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहे.

हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हरलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या वक्तव्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले, तरी त्यांची माया कुठं आहे हे मला माहिती आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

“चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगवेगळे तीन अब्रूनुकसानीचे दावे केले आहेत. चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले तरी त्यांची माया कुठं आहे मला माहिती आहे,” असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

“मी पुन्हा येईन म्हणून काहीही होणार नाही”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले आहेत. भाजपचे नेते सहकार्य करण्याऐवजी आडमुठी भूमिका घेतात. मी पुन्हा येईन म्हणून काही होणार नाही, असा खोचक टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला घाबरत नाही. पण माझी सर्व प्रॉपर्टी विकली तर 100 कोटी काय 1 कोटीही मिळणार नाहीत. त्यामुळे हा खटला हसन मुश्रीफ यांनी जिंकला तर त्यांना मलाच विकावं लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वप्रथम मराठा आरक्षणाच्या विषयावर बोललं पाहिजे. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी सरकारने चांगले निवृत्त न्यायमूर्ती नेमावेत. गायकवाड आयोगाने ज्या निष्ठेने काम केले, तसेच काम आताही झाले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं!

News Desk

‘स्थानिक स्व.संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होणार की नाही’, अजित पवार म्हणाले…

News Desk

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पूर्ण केली ६ वर्षीय संचितची इच्छा!

News Desk