HW News Marathi
महाराष्ट्र

हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार, सोमय्यांचं वक्तव्य!

कराड। महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जात असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज (सोमवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड पोलिसांनी कराड रेल्वे स्थानकावर रोखले. यानंतर किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ”पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराडलं थांबवले. ९ वाजता कराड सर्किट हाऊसला मी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार आहे,” असे आव्हान सोमय्या यांनी दिले आहे.कोल्हापूरला जाण्यापूर्वी पुणे स्टेशन येथे सोमय्या यांचे भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले होते. मी महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूर जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. पण त्यांना वाटेतच कराडमध्ये पोलिसांनी रोखले.

हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळ उघड करणार

कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार, पहाटे पावणेपाच वाजता भाजप नेते माजी खासदार सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कराड रेल्वे स्थानक ओगलेवाडी येथे उतरले. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे.किरीट सोमय्या सध्या शासकीय विश्रामगृहावर आहेत. सकाळी 9 वाजता सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद आटोपून सोमय्या मुंबईसाठी रवाना होणार आहेत. यावेळी ते हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळ उघड करणार आहेत.

किरीट सोमय्या यांना घराबाहेर पडू देऊ नका

कोल्हापूर कलेक्टरचा पोलिसांना आदेश आला आहे की, किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला येऊ देऊ नका, सोमय्या यांनी म्हटलं आहे की, गृहमंत्र्यांचा आदेश असल्याची माहिती मला देण्यात आली आहे, कसेही करुन किरीट सोमय्या यांना घराबाहेर पडू देऊ नका, किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला कसेही करुन पोहचू देऊ नका, सोमय्या कोल्हापूरला गेले तर तक्रारीचे कागदपत्र सादर करुन घोटाळे बाहेर येतील. यामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही राजीनामा द्यावा लागेल म्हणून ही सगळी गुंडगिरी सुरु आहे असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पूजाने आई-वडिलांचं ऐकलं असतं तर…”, पूजा चव्हाणच्या आजी-आजोबांची प्रतिक्रिया

News Desk

हे पाहून आनंद झाला की ‘गुंडा सरकार’ला राज्यपाल प्रश्न विचारतायत – कंगना राणावत

News Desk

माझ्या ताफ्याला कोणी अडवणार हे इंटेलिजन्सला कळाले, पण पवारांच्या घरावरील हल्ल्याची कल्पना नव्हती?, राज ठाकरेंचा सवाल

Aprna