HW News Marathi
महाराष्ट्र

कदमांनी केलेल्या आरोपानंतर परब अन् सामंतांनी दिल्या प्रतिक्रिया

मुंबई | शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केला आहे. कदमांनी आज (१८ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यावर आरोपाच्या फैऱ्या झाडल्या आहेत. “मी गद्दार नाही, शिवसेनेचा गद्दार अनिल परब आहे ?, अनिल परब हा शिवसेनेचा मतदार संघ राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघालाय,” असा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडली.

कदमांनी केलेल्या आरोपावर बोलताना उदय सामंत म्हणाले, “जर मी शिवसेनेच्या विरोधात काम केले असेल. आणि आदेश डावलला असेल तर, मी प्रायश्चित करण्यास तयार आहे. तसेच आमच्या काही चुकत असेल तर आमचे कान धरण्याचा अधिकार त्यांना आहे, असे त्यांनी म्हटले. तर दुसऱ्या बाजुला अनिल परबांना याबद्दल विचारल्या ते म्हणाले, “मी यासंदर्भात काही बोलू इच्छित नाही. माझ्यावर काही आरोप केले तरी त्यांचे उत्तर मी देणार नाही. मी शिवसैनिक आहे, ते शिवसेनेचे नेते आहेत.यासंदर्भात जी काही दखल घ्याची आहे ते पक्ष घेणार, असे त्यांनी प्रसार माध्यांना उत्तर दिले. 

कदम नेमके काय म्हणाले

परब काय पक्षप्रमुख झाला का?, कदमांचा सवाल “मी उद्धवसाहेबांना माझी विनंती आहे, तुमची तब्यात ठिक नाही हे मी समजू शकतो. आदित्यसाहेबांना योगेशने फोन केला. तेव्हा देखील मी अनिल परबांना सांगतो. सुभाष देसाईना फोन केल्यानंतर मी अनिल परबांना सांगतो. तो रत्नागिरीचा आमचा नेता उदय सामंत त्यांना फोन केला तर मी अनिल परबला सांगतो. कोण अनिल परब तो काय पक्षप्रमुख झाला का?तो पालकमंत्री असाल तरी तो पक्ष बांधायला आलाय का तो, अशा पद्धतीने या अनिल परब अनिल परब चालेय. मी उद्धवजींना हात जोडून सांगेन यांच्या डोक्या मस्ती गेली. याचे पाय जमिनीवर नाही येत आणि म्हणून त्यांचे पाय पुन्हा जमिनीवर आणा. मी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्याला हरामखोर म्हटले. त्या हारामखोराला थांबवा. याला मंत्री पद दिले. ते नेत्यांना संपवण्यासाठी नाही. शिवसेना वाढवण्यासाठी आहे. मी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले,” असे कदम म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस दिल्लीश्‍वरांचे पाय चाटतात | विनायक राऊत

News Desk

निकालापूर्वीच मुश्रीफांची विजयी मिरवणूक तर पुण्यात दोडके यांनी बॅनरबाजी

News Desk

या कामासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून मला करोडो रुपये… महेश टिळेकरांचा संताप

News Desk