HW News Marathi
महाराष्ट्र

पाठीमागून हल्ले करणारे हे नामर्दाची अवलाद | उद्धव ठाकरे

अहमदनगर | उद्धव ठाकरे यांनी केडगाव दुहेरी हत्याकांत मुत्यमुखी पडलेल्या संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत असातना ते बोलत होते. की, ‘शिवसैनिकांवर पाठीमागून हल्ले करणारे हे नामर्दाची अवलाद आहेत, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमने सामने येऊन वार करावा.

जर अशा गुन्हेगारांना पाठीमागे घातले जात असेल तर शिवसेनेला कायदा हातात घ्यायचा विचार करावा लागेल. गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही तर अशा नामर्दाच्या अवलादींना शिवसेना आपल्या पद्धतीने ठेचून काढेल,’ असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

या हत्याकांडातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. यातील आरोपींना कोणतीही दयामाया दाखवण्यात येऊ नये. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करावा. हे आरोपी कोणत्याही पक्षांचे असले तरी त्याला कायद्यानुसार शिक्षा ही झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून तुम्ही राज्यकारभार चालवणार असाल तर गुन्हेगारांना शिक्षा करा, अन्यथा महाराजांचे नाव घेऊ नका,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Related posts

आज मराठा आरक्षणाचा निकाल

News Desk

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याबाजुने सर्व सदस्य एकवटले…

News Desk

भाजपशी युती बाळासाहेबांनी जपली, उद्धव ठाकरें तेव्हा कॅमेरा घेऊन फिरत होते, निलेश राणेंचा पलटवार

News Desk