HW News Marathi
मुंबई

मांजरेकर कॉंग्रेसमध्ये जाणार का ?

मुंबई | सुप्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुक अवघे काही दिवस राहील्यामुळे मांजरेकर कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला सध्या उधान आले आहे.

मांजरेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी २०१४ ला उत्तर पश्चिम मतदार संघातून मनसेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी कॉंग्रेसच्या गुरुदास कामत यांचे कडवे आव्हान होते. मांजरेकरांना त्यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता.

२०१९ च्या लोकसभा निवडणूकी आधी मांजरेकर कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. मांजरेकर हे मनसे अध्यक्षांचे निकटवर्तीय असले तरी ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे जवळचे मित्र आहेत. राज ठाकरे यांची साथ सोडून मांजरेकर काँग्रेसमध्ये जाणार का हे येत्या काळात पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिच्या गुप्तांगात खुपसली लाठी म्हणून तिचा मृत्यू

News Desk

फेरीवाल्यांविरुद्ध लढण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा. –रामदास आठवले

News Desk

‘Beach Please’ एक अनोखा उपक्रम

News Desk