HW News Marathi
महाराष्ट्र

साताऱ्यात काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 2 घटना, घरं गेली दर्दी खाली

सातारा | कोकणात अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. अशीच एक घटना साताऱ्यात घडली आहे. देवरुखवाडीवर दरड कोसळून पाच घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करुन २७ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय तर अजूनही २ महिला बेपत्ताच आहेत.

२ महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या

साताऱ्यात देखील मुसळधार पाऊस सूर आहे. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळत आहेत. काल संध्याकाळी ६.३० वाजणेच्या सुमारास मौजे कोंढावळे, ता. वाई जि. सातारा येथील देवरुखवाडी मध्ये अतिवृष्टीने भूस्खलन झालं. यामध्ये ५ घरं पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्या खाली दबली गेली. तसेच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २७ नागरिकांची सुटका करण्यात आलेली असून, अजून २ महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आहेत.

पटनामध्ये दरड कोसळकी

पटनामध्ये गुरुवारी रात्री ही दुखत घटना घडली आहे. पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत या भागातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे तर किल्ले मोरगिरी येथेही दरड कोसळल्याने महादेवाचे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे. येथील परिसरातील ग्रामस्थांना प्रशासनाने इतरत्र हलवले आहे ही घटना ही गुरुवारी सायंकाळी घडली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अखेर तिच्या आई वडिलांनी दिले स्पष्टीकरण

Manasi Devkar

ठाकरे सरकारच्या पहिल्या अधिवेशनात १८ विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर

swarit

महिलेवर सामूहिक बलात्कार , दोघाना अटक

News Desk