मुंबई | मुंबईत संपूर्ण रात्रभर पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. काल (२२ सप्टेंबर) संध्याकाळ पासून मुंबईत पावसाने जोर धरला आहे. कालपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर आज(२३ सप्टेंबर) सकाळीसुद्धा कायम असल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं आणि रस्तेही जलमय झाले. दक्षिण मुंबईतील बहुतांश भागांमध्ये पाणी साचल्यामुळं अनेक अडचणी उदभवल्या असून, मुंबईकरांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. दुकानांपासून अनेकांच्या घरांमध्येही पावसाचं पाणी शिरल्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसानही झाल्याचं कळत आहे. दरम्यान परिस्थिती सामान्य होण्यास ७-८ तास लागणार असल्याची माहिती दिली जात आहे.
#WATCH Maharashtra: Railway tracks submerged at Sion railway station in Mumbai, following heavy downpour in the city. pic.twitter.com/4CONRkH9Fk
— ANI (@ANI) September 23, 2020
वडाळा, माझगाव डॉक, भायखळा, दादर, हिंदमाता हे सारे भाग जलमय झाले आहेत. अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्यामुळं अत्यावश्यक सेवांसाठी सुरु असणारी रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. कुर्ला, सायन, दादर या रेल्वे मार्गांवर पाणी साचल्यामुळं रेल्वे वाहतुकीवर याचे थेट परिणाम झाले आहेत. पश्चिम रेल्वेवर पावसामुळं फारसा खोळंबा झालेला नसला तरीही मध्य रेल्वेची वाहतूक या मुसळधार पावसामुळं कोलमडलं आहे. गोरेगाव, अंधेरी सबवे याशिवाय अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळं बहुतांश मार्गांवरी रस्ते वाहतुकही वळवण्यात आली आहे. त्यामुळं नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. तसेे, चनागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.
Brihanmumbai Municipal Corporation declares holiday for all pvt & govt establishments, except emergency services, after severe waterlogging and heavy rainfall in many parts of the city. Commissioner has appeared public to come out of their homes only if necessary: BMC. #Mumbai pic.twitter.com/2sGbbtr1yT
— ANI (@ANI) September 23, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.