मुंबई । राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह उपनगरामध्ये शुक्रवारी ( २ऑगस्ट) मुसळधार पाऊस पडत आहे. येत्या २ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने जोर धरला.
पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले आहे मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गावरील लोकलसेवा १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.