HW News Marathi
क्राइम

अनिल परब यांचे म्हणणे ऐकू- उच्च न्यायालय

मुंबई | परब यांच्यासह परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार होत आहे, असा आरोप करून सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका निलंबित आरटीओ अधिकारी गजेंद्र पाटील यांनी ॲड. व्ही. पी. राणे यांच्यामार्फत काही महिन्यांपूर्वी केली. याविषयी बुधवारी प्राथमिक सुनावणी झाली.

सुनावणी घेतल्याविना आम्ही कोणताही आदेश देऊ शकत नाही

‘राजकीय हेतू साध्य करण्यासाठी व राजकीय संघर्षासाठी न्यायालयाचा वापर व्हावा, असे आम्हाला वाटत नाही’, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान बुधवारी नोंदवले. ‘आम्हाला सर्व प्रतिवादींचे म्हणणे ऐकावे लागेल. त्यांची सुनावणी घेतल्याविना आम्ही कोणताही आदेश देऊ शकत नाही’, असे स्पष्ट करत न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने या याचिकेवर ८ ऑक्टोबरला प्रत्यक्ष न्यायालयात सुनावणी ठेवली.

‘याचिकादार गजेंद्र पाटील यांनी या सर्व आरोपांविषयी नाशिक शहर पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हणणारा अहवाल पोलिस आयुक्तांनी तयार केला. मात्र, तो अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. तो अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश आयुक्तांना द्यावेत’, अशी विनंती पाटील यांच्यातर्फे अॅड. रणजीत सांगळे यांनी खंडपीठाला केली. मात्र, सर्व प्रतिवादींचे म्हणणे ऐकल्याविना कोणताही आदेश देऊ शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संघ मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

धुळ्यात पाच जणांची हत्या, २३ जणांना अटक

News Desk

कोरियन महिलेसोबत विनयभंग होणारा व्हिडिओ व्हायरल; आरोपींना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

Aprna