HW News Marathi
देश / विदेश

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना ‘भारतरत्न’ द्या !

नागपूर | अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (५ फेब्रुवारी) लोकसभेत केली. राम मंदिराच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह चारही जणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडीया यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.

“उद्धव ठाकरे कुणासोबत सत्तेत आहेत, हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. पण ते हिंदूंसाठी काय करतात? हे महत्त्वाचे आहे. उद्धव यांनी हिंदूत्त्वचे काम करत रहावे. माझे त्यांना समर्थन आहे”, असे मत प्रविण तोगडीया यांनी व्यक्त केले. याशिवाय “जेव्हा भाजपचे कुणी तोंड पहायला तयार नव्हते, तेव्हा शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपची साथ दिली. आता अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मागितले तेव्हा भाजपने ते द्यायला हवे होते”, असे म्हणत प्रविण तोगडीयांनी भाजपवर टीका केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे सत्तांतर प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच; 21 आणि 22 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी

Aprna

UP मध्ये 12 वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळला; योगी आदित्यनाथांचा निर्णय

Aprna

मोदींसाठी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची वेळ बदलली, काँग्रेसचा आरोप

Gauri Tilekar