HW News Marathi
महाराष्ट्र

मोहरम निमित्ताने मिरवणूका काढता येणार नसल्याच्या गृह विभागाच्या सूचना!

मुंबई। मोहरम’निमित्त विविध ठिकाणी मुस्लीम बांधवांतर्फे वाझ/मजलीस तसेच मातम मिरवणूका आयोजित करण्यात येतात. मात्र यंदा कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसुन, मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे.

मोहरम साध्या पद्धतीने साजरा

कोविडच्या पार्श्वभुमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले असल्याने त्यानुसार गृह विभागाने मोहरम साध्या पद्धतीने करण्यासाठी गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

मातम मिरवणूका काढता येणार नसल्याच्या सूचना

‘योम-ए-आशुरा’ निमित्ताने मातम मिरवणूका काढण्यात येतात. परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूका काढता येणार नसल्याच्या सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. खासगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम करु नये.

स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी

शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया/आलम काढू नयेत. सबील/छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सदर ठिकाणी सामाजिक अंतर तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणं महत्त्वाचं असल्याचं गृहविभागाने स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाण्याच्या सद्यपरिस्थितीनुसार नागरिकांना पाणी पट्टीमध्ये दिलासा ! – सुभाष देसाई

Aprna

‘मराठा आरक्षण मिळालं तरीही आम्ही मोर्चे काढू’, नरेंद्र पाटलांचा इशारा

News Desk

नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची १३ ऑगस्टला प्रसिद्धी

Aprna