HW News Marathi
महाराष्ट्र

जिल्हा बँकेच्या निवडणुका घेण्यासाठी परवानगी!

मुंबई। राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. दुकानं, लोकल सेवा सुद्धा आता पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहे. आता लांबणीवर टाकण्यात आलेल्या निवडणुकी घेण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे. जिल्हा सहकारी बँक निवडणुका घेण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे.

सहकार विभागाने आदेश दिले होते

एप्रिल महिन्यात राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत असल्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता 31 ऑगस्टपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी बँका यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा सहकार विभागाने आदेश जाहीर केला होता.

निवडणुकीचे मार्ग मोकळे

पण, आता राज्यात कोरोनाची लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे मार्ग मोकळे झाले आहे. जिल्हा सहकारी बँक निवडणूक आता पुन्हा एकदा घेण्यात येणार आहे. अनेक जिल्हा बँकांची 5 वर्षांची मुदत संपली आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकांच्या निवडणुका या कोरोनाचे नियम पाळून घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुढे ढकलण्यात आल्या होत्या

मार्च महिन्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे राज्यात ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यात. त्यानंतर राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका, पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. पण, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 6 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला भीषण आग; ७ जणांचा मृत्यू

News Desk

मुंबई महानगरपालिकेला माझा सलाम –  जावेद अख्तर

News Desk

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर थोड्याच वेळात शरद पवारांची पत्रकार परिषद

News Desk