HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले,गृहमंत्री अनिल देशमुखांचा खळबळजनक खुलासा !

मुंबई | महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकार आणि पोलिसांबाबत एक मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. लोकमत ऑनलाईनच्या विशेष मुलाखतीत बोलताना राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. गृहमंत्र्यांनीचं हे विधान केल्याने आता या विधानावार उलटसुलट प्रतिक्रीया येत आहेत.

गृहमंत्री म्हणाले, ठीक आहे, तसे काही मला एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. पण हे सांगताना गृहमंत्र्यांच्या चेहºयावरील अस्वस्थता आणि नाराजी लपून राहिली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाºयांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाºयाचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारनं सात-बारा कोरा करण्याचा शब्द पाळला नाही – विखे पाटील

News Desk

कोरेगाव-भीमा प्रकरणात पोलिसांनी पुरावे तोडून-मोडून सादर केले…

swarit

“…नाहीतर या देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहिलं”, संजय राऊतांचा गंभीर इशारा

News Desk