HW News Marathi
महाराष्ट्र

कुठल्याही परिस्थितीत ५२०० पदं तातडीने भरणार, गृहमंत्र्यांची ग्वाही

औरंगाबाद | राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे गृहमंत्र्यांनी आज (१२ जुलै) पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांनी यावेळी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण १२ हजार २०० पदांची भरती केली जाईल, अशी माहिती आणि ग्वाही त्यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती ३१ डिसेंबर पूर्वी ५२०० पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार असून त्यानंतर ७ हजार पदे भरली जातील अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

डिसेंबर पूर्वी ५२०० जागांवर भरती

दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी ५२०० जागांवर भरती केली जाईल, अशी घोषणा केली. तर, उर्वरित ७ हजार पदांची भरती नंतर केली जाईल अशी माहिती दिली. औरंगाबाद येथे पोलीस दलाच्या अनुषंगानं विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं आहे. पुढे दिलीप वळसे पाटील म्हणाले, आज औरंगाबाद परिक्षेत्राची बैठक झाली. कायदा सुव्यवस्था परिस्थिती आणि गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण याबाबत चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांना चांगली घरे चांगली सुविधा मिळाव्यात याबाबत चर्चा झाली आहे.

सर्वसामान्यांना सौजन्याची वागणूक द्या

सर्वसामान्य माणसाला सौजण्याची वागणूक मिळाली पाहिजे. महिला आणि त्याबाबत घडणारे गुन्हे याबाबत आस्थेवाईकपणे निर्णय घेतले पाहिजे. दोषींना शिक्षा केली पाहिजे या सूचना दिल्या असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले. आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्हे यांचं प्रमाण मोठं आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर शाखेने चांगलं काम केलं पाहिजे. सोशल मीडियातून महिलांची बदनामी केली जाते याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजच्या हिवाळी अधिवेशनात ६ अध्यादेश, १० विधेयके मांडणार

News Desk

दूध आंदोलन म्हणजे पुतण्या- मावशीचं प्रेम आहे ,राजू शेट्टी यांचा भाजपला टोला

News Desk

अमित शहांच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा होणार शुभारंभ!

News Desk