HW News Marathi
महाराष्ट्र

होम क्वॉरंटाइन असलेल्यांनो घराबाहेर पडू नका, तुमच्यावर २४० होमगार्डची करडी नजर

जालना | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यात कुणी जाऊ, येऊ नये म्हणून नाकेबंदी करण्यात आली आहे. कुणी दुसऱ्या जिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश करीत असल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात तपासून लक्षणे दिसल्यास क्वॉरंटाइन केले जाते. तर खबरदारी म्हणून काहींना त्यांच्याच घरी होम क्वॉरंटाइन केले जाते. आतापर्यंत जालन्यात १६ हजार २३४ चाचण्या घेतल्या. यात अलगीकरण २२२ , होम क्वॉरंटाइन ६१ , संस्थेत १६१ जण आहेत. दरम्यान , काही ठिकाणी अख्खे कुटुंबही क्वॉरंटाइन करावे लागले आहे. परंतु क्वॉरंटाइचे हातावर शिक्के असताना काही जण रस्त्यांवर फिरताना पोलिसांच्या नजरेस पडल्याने प्रशासन सतकं झाले. संसर्ग वाढू नये यासाठी क्वॉरंटानचे शिक्के असलेल्यांवर कुटुंबीयांवर २४० होमगार्डची करडी नजर राहणार आहे.

जालना शहरातील दुःखी नगर भागातील एका महिलेचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या महिलेच्या संपकात आलेल्यांना क्वॉरंटाइन करण्यासाठी आरोग्य विभागासह पोलिसांची पथके कामे करीत आहेत दरम्यान, लक्षणे आढळून आलेल्यांना तत्काळ उपचार होण्यासाठी जालना शहरासह काही तालुक्यांच्या ठिकाणी अलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहे. अशांवर उपचार नागरिकांच्या संपर्काबाहेर राहण्यासाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहे. या कक्षांमध्ये संबंधीत व्यक्तींना १४ दिवस क्वॉरंटाइनमध्ये ठेवले जाते. नंतर लक्षणे न दिसल्यास त्यांना पुन्हा घरी जाऊ दिल्या जाते. परंतु, अनेकदा काही जण परजिल्हा, परराज्य, इतर देशातून आलेले असतात . अशावेळी तत्काळ लक्षणे दिसत नाहीत. परंतु, धोका नको म्हणून डॉक्टरांकडून अशांना घरच्या घरी क्वॉरंटाइन केले जाते. त्यांना सर्व बाबी वेगवेगळ्या ठिकाणी करून दिल्या जातात. परंतु, अनेकदा होम क्वारंटाइन असलेले काही याचे गांभीर्य न घेता गल्लीत येतात, नागरिकांच्या समूहातही सहभागी होतात. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका असतो.

शहरातील विलगीकरण कक्षातून एक महिला अशाच प्रकारे बाहेर पडली होती. परंतु पोलिसांनी तिला तत्काळ पकडून विलगीकरण कक्षात स्थानबद्ध केले. नवीन जालना भागातही क्वॉरंटाइनचा शिक्का असलेला एक जण बाहेर फिरताना आढळून आला, घरच्या घरी क्वॉरंटाइन असलेले काहीजण अशाच प्रकारे बाहेर पडून संसर्ग वाढण्याची शक्यता असते. यामुळे पोलिस प्रशासनाने क्वारंटाइन असलेल्यावर नजर ठेवण्यासाठी होमगार्ड यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. यामुळे काही प्रमाणात का होईना क्वॉरंटाइन असलेल्यावर वचक बसणार आहे, क्वॉरंटाइन असताना बाहेर पडून असे कृत्य केल्यास पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली जाते. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवल्या जात आहे .

अशी होईल कारवाई

क्वॉरटाइन असलेल्यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर १८८ नुसार, आदेशाचे उल्लंघन, घोका होईल अशा प्रकारचे वागणे, समाजात आजार पसरवणे याच्या उल्लंघनासह दंडात्मक कारवाई होऊ शकते. नागरिकांनीही सतर्क राहून कुठे हातावर शिक्के असलेला नागरिक दिसल्यास तत्काळ पोलिस, आरोग्य विभागाच्या नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. यामुळे होम क्वॉरंटाइन असलेल्या कुटुंबीयांनी घराबाहेर न पड़ता स्वत : ची काळजी घ्यावी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पोहरादेवी गडावर संजय राठोडांनी सत्य बोलावं”, पूजाच्या आजीची मागणी

News Desk

‘मुंबई, महाराष्ट्रानं अनेक लोकांना धनवान केलंय’, राऊतांचा विरोधकांना टोला

News Desk

“नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली तर…”

News Desk