मुंबई | महाराष्ट्रात गेले अनेक दिवस बंद असलेले हॉटेल आणि लॉज सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. ८ जुलैपासून हॉटेल आणि लॉज सुरु केले जाणार आहेत. आज (६ जुलै) मुख्य सचिव यांनी याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे. मात्र, कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या तरी हॉटेल आणि लॉज सुरु करता येणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे.
लॉज, गेस्ट हाऊस अशा सुविधा पुरवणारी कंटेन्मेंट झोनबाहेरील हॉटेल्स ३३ टक्के क्षमतेसह चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जे हॉटेल किंवा लॉज क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात असल्यास महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत त्या क्वारंटाईन सुविधेसाठीच वापरल्या जातील. किंवा त्यांचा उर्वरित भाग (६७ टक्के) महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरला जाऊ शकतो, असेही यात नमूद केले आहे.
संस्थांनी काय काळजी घ्यावी?
– कोव्हिडपासून बचावासाठी उपाययोजनांची माहिती देणारे फलक/पोस्टर/एव्ही मीडिया दर्शनी भागात लावावेत.
– हॉटेल आणि पार्किंगसारख्या भागात गर्दीचे योग्यरित्या नियोजन करावे. रांगा किंवा आसन व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी वर्तुळे आखावीत.
– प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक. रिसेप्शन टेबलजवळ प्रोटेक्शन ग्लास आवश्यक असणार आहे.
– पायाने वापरता येणारी (पेडल ऑपरेटेड) हँड सॅनिटायझर मशीन रिसेप्शन, गेस्ट रुम, लॉबी इथे मोफत उपलब्ध करावीत.
– फेस मास्क, फेस कव्हर, ग्लोव्हज या गोष्टी हॉटेल कर्मचारी आणि ग्राहक या दोघांसाठी उपलब्ध करावीत.
– चेक इन आणि चेक आऊट करण्यासाठी QR कोड, ऑनलाईन फॉर्म, डिजिटल पेमेंट, ई-वॉलेट अशी विनासंपर्क वापरता येणारी प्रणाली ठेवावी.
– सोशल डिस्टन्सिंग पाळून लिफ्टमधील व्यक्तींची संख्या मर्यादित ठेवावी.
– एसी- सीपीडब्ल्यूडीच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात. सर्व एअर कंडीशनचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस या मर्यादेत असावे. आर्द्रता ४० ते ७० टक्के राखावी. ताजी हवा खेळती राहावी यासाठी क्रॉस व्हेंटिलेशन उत्तम असावे.
अन्य महत्त्वाच्या सूचना –
– कोव्हिडची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश
– फेस मास्क असल्यासच प्रवेश, हॉटेलमध्ये असताना संपूर्ण वेळ मास्क घालणे आवश्यक असणार आहे.
– प्रवाशांचे तपशील (प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय स्थिती) आणि ओळखपत्र रिसेप्शनवर देणे बंधनकारक असणार आहे.
– आरोग्य सेतू अॅप वापरण्याची ग्राहकांना सक्ती
– हाऊसकीपिंग सुविधा कमीत कमी वापरण्यावर ग्राहकांनी भर द्यावा.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.