मुंबई | संपूर्ण देशात विविध राज्यांत अनेक श्रमिक, मजूर अडकले आहेत. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी सरकारने विशेष ट्रेन सुरु केल्या आहेत. त्याची माहिती देखील वेळोवेळी देण्यात येत असताना आज (१९ मे) पुन्हा एकदा वांद्रा स्थानकाबाहेर मजूरांची गर्दी दिसली. वांद्रे स्टेशनहून एक श्रमिक स्पेशल ट्रेन बिहारसाठी सुटणार आहे. या ट्रेनसाठी साधारण १ हजारांच्या आसपास लोकांनी बुकिंग केले आहे. त्यांना या ट्रेनने जाण्याची मुभा देण्यात आली आहे.
मात्र तरीही वांद्रे स्टेशनच्या बाहेर गर्दी पाहण्यास मिळते आहे. ज्या लोकांनी या ट्रेनसाठीचे बुकिंग केले नाही त्या स्थलांतरित मजुरांचीही गर्दी वांद्रे स्टेशन बाहेर पाहण्यास मिळाली. पोलिसांनी गर्दीवर जरी नियंत्रण मिळवले असले तरीही स्ऱलांतरित मजूरांच्या अशा एकत्र येण्याने कोरोनाचा धोका आणखी वाढत आहे. या आधी १४ एप्रिलला स्थलांतरित मजूरांनी अशाच प्रकारची गर्दी वांद्रा स्थानकाबाहेर केली होती. त्याचीच प्रचीती आज पुन्हा एकदा आली.
#WATCH Maharashtra: Huge crowd of migrant workers gathered outside the Bandra railway station in Mumbai earlier today to board a "Shramik special' train to Bihar. Only people who had registered themselves(about 1000) were allowed to board, rest were later dispersed by police. pic.twitter.com/XgxOQmSzEb
— ANI (@ANI) May 19, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.