HW News Marathi
Covid-19

HW Exclusive | विदेश बहोत देख लिया, अब अपना देश देख लो !

मुंबई | संपूर्ण जगाला सध्या ‘कोरोना’चा विळखा आहे. या ‘कोरोना’मुळे जवळपास सर्वच देश सध्या लॉकडाऊन आहेत आणि सर्वच क्षेत्रांना याचा फटका बसला आहे. मात्र, ‘कोरोना’चा सर्वाधिक फटका बसलेल्या अनेक क्षेत्रांपैकी एक आहे म्हणजे ‘पर्यटन क्षेत्र’. पर्यटन क्षेत्रावर सद्यस्थितीत आणि भविष्यात होणारा कोरोनाचा परिणाम अधिक तीव्र असण्याची शक्यता असल्याने या आव्हानाला सामोरे जाण्याची राज्याची रणनीती काय ? हे जाणून घेण्यासाठी आज (२९ एप्रिल) एच.डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या व्हिडीओ कॉल इंटरव्ह्यूच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी अदिती तटकरे यांनी ‘कोरोना’नंतरच्या काळात राज्यात पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी कोणकोणते मुद्दे महत्त्वपूर्ण ठरतात, तसेच त्यादृष्टीने कसे काम केले जाईल याबाबत एच. डब्ल्यू. मराठीशी सविस्तर बातचीत केली आहे.

विदेश बहोत देख लिया, अब अपना देश देख लो !

“काहीच दिवसापूर्वी माझी आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांची राजस्थानच्या पर्यटन मंत्र्यांशी याविषयावर चर्चा झाली. लक्षात घ्यायाला हवे कि राजस्थान, केरळ, गोवा ही राज्ये आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्रावर अवलंबून आहेत. आम्ही यावेळी प्रयत्न क्षेत्रांत पुढच्या काही शक्यतांवर चर्चा केली. आता आंतरराष्ट्रीय पर्यटन तरी आणखी १ ते दीड वर्ष सुरू होणार नाही. त्यामुळे, देशांतर्गत पर्यटनाला मोठा वाव आहे. म्हणूनच येत्या काळात आम्ही “विदेश बहोत देख लिया, अब अपना देश देख लो” या विचाराने नव्याने पर्यटन क्षेत्राला उभारी कशी देता येईल ? यादृष्टीने काम करण्याचा विचार आहे”, असे अदिती तटकरे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

ट्रॅव्हल एजन्सीजना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न !

“कोरोनाच्या या काळात ट्रॅव्हल एजन्सीजना खूप मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यातील प्रत्येक लहान-मोठ्या घटकाला दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. विविध पॅकेजेसच्या माध्यमातून या ट्रॅव्हल एजन्सीजला कशापद्धतीने सुस्थितीत आणता येतील याचा विचारही आम्ही करत आहोत. त्यामुळे, आता स्पेशल पॅकेजेस देऊन, राज्या-राज्यांमध्ये योग्य समन्वय साधत पर्यटन क्षेत्राला कसे प्रमोट करता येईल ? यादृष्टीने चर्चा सुरु आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या पर्यटन विभागासाठी खूप चांगला निधी दिला आहे. त्याचा योग्य आणि प्रभावशाली वापर करता येईल, याकडे आमचा भर असेल”, असे अदिती तटकरे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील पुढील आठवड्याचं लसीकरण जाहीर, थेट केंद्रावर येणाऱ्यांना देणार लस

News Desk

राज्यात आज १०,४८३ नवे रुग्ण आढळले

News Desk

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्माचाऱ्यांना पगार न दिल्यास त्यांची मान्यता होणार रद्द !

News Desk