HW News Marathi
देश / विदेश

HW Exclusive | भाजपची राज्य सरकारवर टीका, अमित देशमुखांनी दिला ‘हा’ सल्ला !

मुंबई | “कोरोनाच्या या संकटावर मात केल्यानंतर एकमेकांवर टीका करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. तेव्हा आता एकजुटीने लढून या संकटावर मात करूया”, असा सल्ला राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील केंद्र असो वा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राज्यात मात्र वारंवार विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून महाराष्ट्र सरकारवर टीका होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार करत असलेल्या कामावर महाराष्ट्र भाजपकडून वारंवार शंका उपस्थित केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता अमित देशमुख यांनी महाराष्ट्र भाजपच्या सर्व नेत्यांना हा सल्ला दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे आपण सर्वच जण घरी आहोत. आपल्याप्रमाणेच सर्व नेतेमंडळीसुद्धा घरून आपले काम करत आहेत. त्यामुळे एच.डब्ल्यू.मराठी आता राज्यसभरातील नेत्यांशी व्हिडीओ इंटरव्ह्यूद्वारे संवाद साधून त्या नेतेमंडळींच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या, त्यांच्या खात्याशी आणि त्यांच्या जिल्ह्यांशी संबंधित सद्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर, एच.डब्ल्यू मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी अमित देशमुख यांच्याशी व्हिडीओ इंटरव्ह्यूद्वारे संवाद साधला. यावेळी भाजपकडून वारंवार होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमित देशमुख नेमके काय म्हणाले ? जाणून घ्या

अमित देशमुखांना भाजपला दिला ‘हा’ सल्ला

“मला आताच्या स्थितीत कोणतेही राजकारण करायचे नाही. या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांनाच एक होऊन काम करावे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही माझी आग्रहाची विनंती आहे कि आपल्याला काय करता येत आहे या बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी या दृष्टीने एकजुटीने काम करूया. या संकटावर मात केल्यानंतर एकमेकांवर टीका करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. मात्र, आता तशी वेळ किंवा काहीही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही”, असे प्रत्युत्तर अमित देशमुख यांनी भाजपकडून होणाऱ्या टीकेला दिले आहे. “सध्याच्या स्थिती सगळेच आपापल्या परीने कार्यरत आहे. केवळ सत्तापक्षच नव्हे तर विरोधी पक्षाची नेतेमंडळी देखील या पार्श्वभूमीवर काम करत आहेत. या संकटावर कशी मात करता येईल यासाठी सगळेच प्रयत्नशील आहेत”, असेही अमित देशमुख यांनी सांगितले.

संपूर्ण मुलाखत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हिंदूस्थान म्हणजे निर्लज्ज लोकांचा देश”-संभाजी भिडे

News Desk

अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांचा पराभव, तर भाजपचे बाबूश मोन्सेरात यांचा विजय

Aprna

नव्या वर्षात गृहिणींना दिलासा, सिलेंडर १२० रुपयांनी स्वस्त

News Desk