HW Marathi
HW एक्सक्लुसिव कोरोना महाराष्ट्र राजकारण

HW Exclusive :बहुतांश लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, रिपोर्ट पॉझिटिव्ह, IMAच्या अध्यक्षांनी सांगितले कारण

पुणे | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. यात कोरोना रुग्णांमधील नवीन समस्यांचा देशाला सामना करावा लागत आहे. याबद्दल राज्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बातचीत केली आहे. “गेल्या काही दिवसांत देशातील मुंबई-पुण्यासह अन्य राज्यात कोरोनाचे असे रुग्ण दिसून येत आहेत, की त्यांच्यात कोरोनाची लक्षणे नाहीत. पण, त्या लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. यामुळे डॉक्टर आणि देशासमोर मोठे प्रश्न उभे राहत आहेत, असे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले. लक्षणे नसलेल्या रुग्णांची तपासणी करणे किंवा त्यांना शोधून काढणे डॉक्टरांना जड जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान,  “या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे इतरांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे दिवसेंदिवस अवघड होईल, असेही भोंडवे म्हणाले.  या रुग्णांमध्ये कोरोनांची लक्षणे न दिसण्यामागचे खरे कारण सांगताना भोंडवेंनी दोन शक्यता सांगितल्या. पहिली शक्यता त्यांनी अशी सांगितली की, काही लोकांमध्ये कोरोनाचे विषाणू लपून राहतात. या व्यक्तींच्या शरीरामध्ये कालांतराने विषाणूचे अंतर्गत गुणधर्म बदलतात. तर दुसरी शक्यता म्हणजे, या लोकांमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव पुरेशाच्या प्रमाणात झालेला नसतो. काही लोकांना फारसा त्रास याचा होत नाही. या लोकांना थोडे अंग दुखणे, ताप येणे असे होत असते. मात्र तरीही त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात, असे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले. दरम्यान, कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या रुग्णांबद्दल जागतिक आरोग्य संघटनांनी कल्पना दिली होती.

कोरोना विषाणू संदर्भात यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या  वैद्यकीय क्षेत्रात कोरोनावरील औषधांचा शोध सुरू आहे. त्यामुळे कोरोनासारख्या साथीवर देखील नक्की औषध मिळेल, असा दिलासाही भोंडवेंनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना त्यांनी दिला आहे.

 

 

Related posts

साप अंगावरून गेला अन मी मुख्यमंत्री झालो: शरद पवार

News Desk

#Article370Abolished : केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयाचे सरसंघचालकांनी केले स्वागत

News Desk

काँग्रेस आमदार आसिफ शेख यांना हत्येची धमकी देणारे अजून मोकाट कसे?: विखे पाटील