HW News Marathi
Covid-19

HW Exclusive : मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, विधनपरिषदेवर संधी मिळाली तर …!

मुंबई | “मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, मला संधी मिळाली तर आजवर लोकांसाठी काम केले. तसेच काम करेन,” असा विश्वास राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. विधानपरिषदेवर राष्ट्रवादीकडून इच्छुक आहात का असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले ,”शेवटी विधानपरिषदेवर संधी कोणाला द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेतात. पण संधी मिळाली तर लोकांची सेवा करेन,” विधानपरिषदेवर शशिकांत शिंदे यांचे नाव राष्ट्रवादीकडून आघाडीवर आहे.

शशिकांत शिंदे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, शिंदेना पराभवाचा सामना करावा लागला. शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर शरद पवारांना सुद्धा धक्का बसला होता आणि ते श्रीनिवास पाटलांच्या विजयाचा आनंद साजरा करायला साताऱ्याला गेले नव्हते. शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांचे नाते अत्यंत जवळचे आहे. राष्ट्रवादीचे निष्ठावान म्हणून त्यांचे विधानपरिषदेवर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णसेवेची, कर्तव्यनिष्ठेची नोंद इतिहासात होईल !

News Desk

पुण्यातील कोरोनाबाधितांवर आता प्लाझ्मा थेरपी अवलंबणार

News Desk

लाॅकडाऊनमध्ये सूट देणे पुणेकरांना परवडणार नाही !

News Desk