HW News Marathi
महाराष्ट्र

मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्तच!; राणेंच्या आरोपला राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई | भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “संजय राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आहे,”  असा आरोप राणेंनी राऊतांवर केला. राणेंनी आज (१६ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन राऊत आणि महाविकासआघाडीवर हल्लाबोल केला आहे. यानंतर राणेंच्या आरोपवर राऊतांनी प्रत्युत्तर देत म्हटले, “मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्तच आहे. आमचा असलाच तर फक्त शिवसेनेच्या विस्तारावर डोळा आहे.”

राऊत म्हणाले, “आम्हाला अटक होईल म्हणतायत ना, मग आम्हाला अटक होऊ दे. राणेंच्या आरोपावर विनायक राऊत  यांनी शिवालयमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची जी भूमिका आहे. ती योग्य पद्धतीने पत्रकार परिषदेत मांडली आहे. मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्तच आहे. आमचा असलाच तर फक्त शिवसेनेच्या विस्तार हा महाराष्ट्र आणि देशभरात करणे हेच माझ्या डोळ्यासमोर आहे. २०२४ साली शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल आणि बरेचसे लोक तेव्हा बेरोजगार झालेले असतील” 

राणेंनी पत्रकार परिषदेत राऊतांवर काय आरोप केले

राणे म्हणाले, “संजय राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आहे. उद्धव ठाकरेंना हटवल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री करतो. राऊतांना शिवसेना संपण्याची राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. राऊत हे पूर्णपणे राष्ट्रवादीचे आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच राऊत २ जून १९९२ मध्ये हे सामनाचे संपादक म्हणून आले. परंतु, राऊतांना मार्मिकमधून हक्कालपट्टी झाल्यानंतर ते लोकप्रभात गेले. लोकप्रभात असताना त्यांंनी बाळासाहेब ठाकरेंविरोधात लेख लिहिले.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मी घरी बसणार, मी कोरोनाला हरवणार’,आरोग्यमंत्र्यांचा विश्वास

swarit

महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुध्दीमान व व्यासंगी व्यक्तीमत्व हरपले -शरद पवार

News Desk

महाराष्ट्रातील टोलसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुुसे यांच्या बैठकीत झालेले निर्णय 

Sanjay Jog