HW News Marathi
महाराष्ट्र

मी पूर्णत: समाधानी होऊनच इथून जातोय! – वसंत मोरे

मुंबई | मी पूर्णत: समाधानी होऊनच इथून जात आहे. मनसेचे नेते वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. वसंत मोरेंनी आज (११ एप्रिल) ‘शिवतीर्था’वर राज ठाकरेंसोबत चर्चा केली. यानंतर सर्व नाराजी दूर झाल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतानना सांगितले. राज ठाकरेंनी गुढपाडव्याच्या सभेत मदिशीवरील भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावा, अशी भूमिका घेतली होती. परंतु, वसंत मोरे यांनी पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्क केली. यानंतर वसंत मोरेंना पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवले. वसंत मोरे यांच्या जागी नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

वसंत मोरे म्हणाले, “मी समाधानी होऊनच येथून चालो आहे. त्यामुळे बाकीच्या दोन चार दिवसातील जे काही वातावरण होते. मी त्यांना पहिल्या दिवसांपासून सांगतो की, मनसेमध्ये आहे. मनसेमध्येच राहीन. तुमच्या सर्व अडचणी दुरू झाल्या का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, उद्याची उत्तर सभा आहे. उद्याच्या सभेत राज ठाकरे सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. तुम्हाला सर्व पक्षाकडून ऑफर होत्या, यावर म्हटले, सगळ्या ऑफर गेल्या आहेत.”

यापूर्वी वसंत मोरेंनी पुण्याच्या उपविभाग प्रमुख आणि उपशहर प्रमुखांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट झाले. तेव्हापासून पक्षश्रेष्ठी त्यांच्या भूमिकेवर नाराज असून वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देणार चर्चेला उधाण आले. वसंत मोरेंनी पक्षात राहून काम करणार असल्याचे त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर मी समाधानी असून मी शेवटपर्यंत मनसेत राहणार 

राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेत बोलवले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करण्याची महसूल मंत्र्यांची ग्वाही

News Desk

पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत आहेत – निलेश राणे

News Desk

आव्हाडांनी माझा बाप काढला, ती त्यांची संस्कृती…! पाटलांची टीका

Aprna