HW News Marathi
महाराष्ट्र

मी आरक्षणाच्या लढ्यात तुमच्यासोबत, कोल्हेंचे धनगर समाजाला आश्वासन

पुणे | “मी आरक्षणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत आहे”, असे आश्वासन राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी धनगर समाजाला दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण वैध ठरविल्यानंतर आता धनगर आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. अमोल कोल्हे हे बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तेथील काही लोकांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताच आपण आरक्षणाच्या लढाईत धनगर समाजासोबत असल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.

“आरक्षण हे तळागाळातील घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, त्यातच आरक्षणाचे यश असते. ते आरक्षण तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. मी आरक्षणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत आहे”, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी धनगर समाजाला दिला आहे. दरम्यान, धनगर आरक्षणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. “राज्य सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचे नाही”, असा आरोप देखील विरोधी पक्षाकडून केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त”, फडणवीसांचा टोला

News Desk

अमित ठाकरेंनी शिक्षकांसाठी केलेली ‘ही’ मागणी झाली पूर्ण

News Desk

‘भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण’, संजय राऊतांची टीका!

News Desk