बीड | परळी चुकून झालेला विजय धनंजय मुंडे यांना महागात पडणार आहे. पंकजा मुंडे यांचे नाव न घेता धनंजय मुंडेवर टीका केलीय. तसेच परळीत माझा फार्म हाऊस नाही, माझा महाल नाही. अस म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील धारूर येथील शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी चौफेर टीका केली
राज्याच्या राजकारनात आज जी सर्कस सुरू आहे. त्या सर्कशीत आपण नाहीत, ती बाहेरून पाहायला बरी वाटतेय..असा म्हणत आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले, ज्या दिवशी माझ्याकडून जिल्ह्याची बदनाम होईल, त्या दिवशी शेवटचा श्वास असेल. स्वर्गातही गोपीनाथ मुंडे यांची मान खाली जाणार नाही, अशा पद्धतीने वागते आहे. म्हणत पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याच्या बदनामी वर धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिले आहे.
शेतकरी मेळाव्यातून पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर साधला निशाणा
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शेतकरी मेळाव्यातून चांगलीच फटकेबाजी करत भाऊ धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी चौफेर टीका करत म्हणाल्या की, मी मी म्हणणार नेतृत्व महाराष्टाला हवं नाही, तर जनता जनता म्हणणार नेतृत्व महाराष्ट्राला हव आहे. आमच्या काही चुका झाल्या असतील, त्या चुका दुरुस्त करून पुन्हा आम्ही कामाला लागलो आहोत, अस म्हणत पंकजा मुंडे यांनी फटकेबाजी केली. त्या शेतकरी मेळावा दरम्यान धारूर मध्ये बोलत होत्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.