HW News Marathi
महाराष्ट्र

‘…..राऊतांसारख्या सोंगाड्यावर मला बोलायचं नाही’ – प्रसाद लाड

मुंबई। आमदार प्रसाद लाड यांनी वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. , आता प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांकडे दिलगिरी व्यक्त केली पण संजय राऊत सारख्या सोंगाड्यावर बोलणं उचित वाटत नाही, असं म्हटलं आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

व्हिडिओच्या माध्यमातून दिलगिरी

कालच्या वक्तव्यानंतर मी माझा एक व्हिडिओ सर्व प्रसारमाध्यमांना दिला होता. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलं आहे. कैलासवासी शिवसेना प्रमुखांवर प्रेम करतो, आमचं दैवत समजतो, त्या शिवसेना प्रमुखांबद्दल आणि त्यांच्या वास्तूबद्दल बोलल्याबद्दल मी माझी दिलगिरी व्यक्त केली होती. माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे, असं प्रसाद लाड म्हणाले. मात्र, पुढे त्यांना अरेला कारे करायची आमची तयारी आहे, असा इशारा देखील दिला आहे.

व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझा दिलगिरी व्यक्त केलेला व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. राहिली गोष्ट संजय राऊत यांची…तर राऊतांसारख्या सोंगाड्यावर मला बोलायचं नाही, असं प्रसाद लाड म्हणाले.

फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना हा विषय आमच्यासाठी संपला

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या वेळ आली तर शिवसेना भवन फोडू या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. लाड यांनी भाषणाचा विपर्यास केल्याचं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हा वाद अद्याप शांत झालेला नाही. दरम्यान, या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना हा विषय आमच्यासाठी संपला असल्याचं म्हटलं आहे. पण अंगावर कोणी आलं तर आम्ही सोडत नाही, असा इशारा देखील त्यांनी शिवसेनेला दिला आहे.तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. प्रसाद लाड यांनी व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्य़ासाठी हा विषय संपलेला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही; पण अंगावर आलं तर कोणाला सोडत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई हायकोर्टाकडून अकरावीची सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची महिती!

News Desk

14 ऑगस्टला शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

News Desk

राज्यपाल-उद्धव ठाकरे ,अजित पवार भेटीत नेमकं काय घडलं ? १२ आमदारांबद्दल राज्यपाल काय म्हणाले ?

News Desk