HW News Marathi
महाराष्ट्र

“सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार अडचणीत येईल मी सांगितलं होतं”,राऊतांचा गौफ्यस्फोट

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणावर मोठं आणि महत्वाचं वक्तव्य केलं आहे. “सचिन वाझे यांना महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा रुजू करण्याबाबतचा जेव्हा निर्णय घेण्यात येत होता तेव्हाच मी शिवसेनेच्या काही नेत्यांना सांगितलं होतं. वाझेंच्या कामाच्या पद्धतीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकतं, असा इशारा मी तेव्हाच दिला होता”, असा खुलासा संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत यांनी काल (२९ मार्च) प्रसारमाध्यामांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अशाप्रकारचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकारणात कोणता नवा ट्विस्ट येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

‘नेत्यांचं नाव सांगणार नाही’

“मी पक्षाच्या काही नेत्यांना इशारा दिला होता. मी त्या नेत्यांच्या नावाचा खुलासा करु शकत नाही. पण आमच्यात जे संभाषण झालं त्याची सर्वांना जाणीव आहे”, असंदेखील संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

‘सरकारला धडा मिळाला’

“सचिन वाजे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला धडा मिळाला आहे. एका अर्थाने अशा प्रकारची घटना घडली ते चांगलंच झालं, ज्यामुळे धडा शिकायला मिळाला”, असं ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर कोणताही व्यक्ती वाईट नसतो. पण कधीकधी परिस्थिती त्यांना तशी बनवते, असंही ते यावेळी म्हणाले.

‘तेव्हाच सांगितलेलं, अडचणीत याल’

“जेव्हा सचिन वाझेला महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा समाविष्ट करण्याची योजना आखली जात होती तेव्हाच मी काही नेत्यांना सूचित केलं होतं, वाझे आपल्यासाठी अडचणी निर्माण करु शकतात. त्यांचा व्यवहार आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे सरकार अडचणीत येऊ शकतं”, असंही त्यांनी सांगितलं.

‘मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेंचे कामं माहिती नव्हते’

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सचिन वाझे यांचं समर्थन केलं होतं. सचिन वाझे दहशतवादी नाही, अशाप्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. याबाबत राऊत यांना विचारलं असता, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तेव्हा वाझेच्या कामांबाबत माहिती नव्हती”, असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे.

कोण आहेत सचिन वाझे ?

सचिन वाझे हे मुंबई क्राईम ब्रांचचे प्रमुख होते. महाविकास आघाडी सरकार येण्याआधी ते निलंबित होते. पण कोरोना काळात त्यांना सरकारने पुन्हा सेवेत घेतले होते. त्यांना मुंबई क्राईम ब्रांचचं प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, सचिन वाझे हे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणी दोषी असल्याचं समोर येत आहे. ते खरोखर दोषी आहेत का हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. ते सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत. एनआयएकडून सचिन वाझे यांची कसून चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे सचिन वाझे यांचे मनसूख हिरेन यांच्यासोबत असलेले संबंध, याशिवाय सचिन वाझे यांनी नष्ट केलेले पुराव्यांपासून अनेक गोष्टींचा छळा एनआयएने लावला आहे. या केसमध्ये दररोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘साजिशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिये’ छगन भुजबळांची निर्दोष मुक्तते नंतर पहिली प्रतिक्रिया

News Desk

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय

Aprna

“दोन डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार का?” केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk