HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांचा ‘ईडी’च्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब

मुंबई | “ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब केला,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आज (२७ सप्टेंबर) दुपार २ वाजता बॅलार्ड पियर येथील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात स्वतःहून पाहुणचार घेण्यासाठी जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ईडीच्या कार्यलयाबाहेर जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

पवार यांनी पाठवलेल्या ई-मेलला ईडीने रिप्लाय दिला असून, “तूर्तास पवारांच्या चौकशीची गरज नाही आणि भविष्यातही चौकशीची गरज पडेल असे वाटत नाही,” असे या मेलमध्ये नमूद केले आहे”. यानंतर “मी ईडीच्या कार्यालयाला जाण्याचा निर्णय तहकूब केल्याचे पवारांनी प्रसार माध्यमांसमोरअसे स्पष्ट केले. मुंबई पोलिसांनीही २ वेळा पवारांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट दिली. “महाराष्ट्रात संतापाची लाट आहे, त्याची प्रतिक्रिया शहरात, जिल्ह्यात दिसायला लागली आहे. मुंबईबाहेर लोकांना अडवले जात आहे. या सर्व गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते. मी स्वत: गृह खाते सांभाळले आहे. यामुळे माझ्या कोणत्या कृतीमुळे लोकांना त्रास होईल असे मी वागणार नाही त्यामुळे मी ईडी कार्यालयात जाणार नाही”, असे निर्णय शरद पवारांनी घेतला आहे.

ईडीच्या कार्यालायत जाण्याचा निर्ण्य तहकूब

ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय २४ सप्टेंबरला घेताल होता. हा निर्णय मी तहकूब केल्याचे पवरांनी त्यांच्या निवासस्थानी ‘सिल्वर ओक’ येथे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ” मी आज ईडी कार्यालयात जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांना विनंती करणार होती. त्या बँकेत मी संचालक नव्हतो, सभासद नव्हतो”, असे असताना माझ्यावर गुन्हा दाखल केला. मी चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे. आचारसंहिता लागल्यानंतर मी राज्यभर निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असणार आहे.”

शरद पवार म्हणाले, “ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. त्याचप्रमाणे त्या परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे’ असे म्हणत पवारांनी ईडीच्या कार्यालाय बाहेर जमलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आवाहन केले आहे. जनमानसात प्रतिमा खराब करण्यासाठी असे आरोप करण्यात आले आहे, असेही पवार म्हणाले. कार्यकर्त्यांच्या, आम्हाला साथ देणाऱ्या प्रादेशिक पक्षांचे शरद पवारांनी आभार मानतो.

शरद पवार प्रसार माध्यमांशी बोलताना नेमके काय म्हणाले ?

  • कार्यकर्त्यांचे, आम्हाला साथ देणाऱ्या प्रादेशिक पक्षांचे आभार मानतो.
  • जनमानसात प्रतिमा खराब करण्यासाठी असे आरोप करण्यात आले आहे, असे ही पवार म्हणाले
  • मी स्वत: गृह खाते सांभाळले आहे.
  • कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ईडीच्या कार्यालयात जाण्याचा माजा निर्णय तहकूब केला.
  • वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • मी चौकशीपासून पळ काढतोय असं अर्थ निघू नये, जनमानसात प्रतिमा खराब करण्यासाठी असे आरोप करण्यात आले आहे
  • ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये.
  • तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी.
  • मुंबई बाहेरील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाहेरच अडविले जात आहे
  • मी चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे.
  • आचारसंहिता लागल्यानंतर मी राज्यभर निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असणार आहे
  • मी संचालक नव्हतो, सभासद नव्हतो, असे असताना माझ्यावर गुन्हा दाखल केला.
  • ईडी कार्यालयात जाण्याचा पवारांचा निर्णय स्थगित २४ तारखेला पत्रकार परिषद घेऊन मी सांगितले होते

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंडारा रुग्णालय दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई;सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

News Desk

आम्ही सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ, फडणवीसांचं महत्वाचं विधान

News Desk

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पुत्र पार्थ पवारांची ‘ही’ प्रतिक्रिया…

News Desk