HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन अशी मी एजन्सी काढली; फडणवीसांचे गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर

मुंबई | “फडणवीस ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन अशी मी एजन्सी काढली,” असे प्रत्युत्तर विधानसभेचे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रश्नाला माध्यमांशी बोलताना दिले. सभागृहात आज (१४ मार्च) पेन ड्राईव्ह प्रकरणावर रणकंद माजलेले पाहायला मिळाले. पेन ड्राईव्ह केस सीबीआयकडे न दिल्याने भाजपने सभात्याग केला आहे. यानंतर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 

दरम्यान, वळसे-पाटील म्हणाले, “अधिवेशनात पोलीस बदलीचा घोटाळ्याच पहिला पेन ड्राईव्ह दिला. आणि आता डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि मोहम्मद अरशद खान या दोघांच्या संभाषण असलेला ऑडिओ क्लिप असलेला पेन ड्राईव्ह दिला. मला तर असे वाटेत की, तुम्ही आता एखादी डिटेक्टिव एजेन्सी उघडली आहे का?, अशी मिश्कील टीका गृहमंत्र्यांनी फडणवीसांवर सभागृहात केला. यावर फडणवीसांनी सभात्याग केल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, होय, फडणवीस ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन अशी मी एजन्सी काढली,” असे प्रत्युत्तर दिले.

पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे न दिल्यास आम्ही न्यायालयात जावू – फडणवीस

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित असणाऱ्यांना महाविकासआघाडी प्राधान्य देते, असा आरोप फडणवीसांनी केला आहे. पेन ड्राईव्ह केस सीबीआयकडे न दिल्याने भाजपने सभात्याग केला आहे. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे न दिण्यासाठी राज्य सरकारकडे आठवड्याभराचा कालावधी दिला आहे. यानंतर आम्ही न्यायालयात जावू, असा इशारा ही फडणवीसांनी सरकारला दिला आहे. 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाहीये”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावले!

News Desk

अनिल देशमुख पुन्हा अडचणीत येणार? जयश्री पाटील उतरल्या मैदानात!

News Desk

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द,निधीवाटपात कोणत्याही विभागावर अन्याय नाही – अजित पवार

News Desk