मुंबई | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. यानंतर भारताने अमेरिकेला केल्या मदतीबद्दल अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्वीट करून पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. ट्रम्प यांनी केल्या ट्वीटमध्ये भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख केला आहे.
https://twitter.com/realDonaldTrump/status/1247950299408498693?s=20
ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, संकटमय मित्रांच्या मदतीला धावून येण्याची गरज असते. हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या आम्हाल औषध पुरवण्याबाबत निर्णय घेतल्यामुळे भारत आणि भारताच्या लोकांचे आभार. भारताने आम्हाला केली ही मदत कधीच विसरणार नाही. ट्रम्प यांनी मोदींना टॅग करत लिहिले की, कोरोन विरूद्धच्या या लढाईमध्ये मोदी फक्त भारताची नाहीतर मानवतेची मदत करत आहेत. यासाठी ट्रम्प यांनी मोदींचे आभार मानले आहेत.
Fully agree with you President @realDonaldTrump. Times like these bring friends closer. The India-US partnership is stronger than ever.
India shall do everything possible to help humanity's fight against COVID-19.
We shall win this together. https://t.co/0U2xsZNexE
— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2020
मोदींनी ट्रम्प ट्वीटला उत्तर दे म्हणाले की, “अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मी आपल्याशी मताशी पूर्णपणे सहमत आहेत. हेच प्रसंग असतात ज्यांनी मित्र आणखी जवळ येतात. भारत आणि अमेरिकेची पार्टनरशीप आणखी मजबूत झाली आहे. कोविड-19 विरुद्धच्या या लढ्यात भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल. आपण यावर मिळून विजय प्राप्त करु”
आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो भारतात ट्रम्पची धमकी
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हाईट हाऊसमध्ये मीडियाशी बोलता म्हणाले होते की, रविवारी माझे मित्र आणि भारतातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलणे झाले आहे की, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन अमेरिकेला देण्याबाबत चर्चा झाली आहे. यावेळी एका पत्रकाराने ट्रम्प यांना सांगितले की, भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन निर्यात करू शकणार नाही. यावर ट्रम्ह म्हणाले की, भारत आणि अमेरिकेच चांगले व्यापारी संबंध आहे. जर भारताने औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो, असा धमकी वजा इशारा त्यांनी भारताला दिला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.