HW News Marathi
महाराष्ट्र

धारावीत कोरोनामुळे तिसरा बळी, ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील मुंबई शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या जाणाऱ्या धारावीत आता कोरोनाने शिरकाव केला आहे. धारावीत एका ७० वर्षीय करोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. धारावीत कोरोनामुळे आज (९ एप्रिल) तिसरा बळी गेला आहे. त्यामुळे आता धारावी कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे.

कोरोनामुळे मृत झालेली महिला धारावीतील कल्याणवाडीत राहत होती. या सदर महिलेला केईएम रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. तर धारावीत मार्चच्या शेवटी पहिला रुग्ण सापडल्याची बातमी आली होती. यानंतर आतापर्यंत धारावीत १४ कोरोनारुग्ण आहेत. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

आता मुंबईत वरळी, प्रभादेवीनंतर आता धारावी चा हॉटस्पॉट सर्वांत धोकादायक ठरत आहे. धारावीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. म्हणून धारावीत रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. धारावीतील १० भागांमध्ये भाजीविक्रीसुद्धा बंद आहे. ये-जा करणारे रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑपरेशन क्लिनअप – भाग २ सुरू ! पोलीस आयुक्त हेमंत नगराळे ‘ऍक्शन मोड’मध्ये

News Desk

अभिजित बिचुकले दोन्ही राजांना देणार आव्हान, साताऱ्यात उभारणार पॅनल

News Desk

‘परीक्षेचं हॉल तिकीट दाखवा आणि लोकलचं तिकीट मिळवा!’

Jui Jadhav