HW News Marathi
महाराष्ट्र

“मी मास्क काढणार नव्हतो मात्र…” अजित पवार म्हणाले!

पुणे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना नियमांचं कटाक्षानं पालन करणारे नेते म्हणून ओळखले जातात. ते सार्वजनिक कार्यक्रमात मास्क घालणं, इतरांना घालायला सांगणं, सॅनिटायझर सोबत ठेवणं याबाबत ते सतर्क असतात. मात्र काल पुण्यात अजित दादांच्या सभेत कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं पाहायला मिळालं. मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त काल एक सभा झाली. या सभेला तुफान गर्दी झाली. पण ही सभा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाषणांनी गाजली. विशेष म्हणजे या सभेत आमदार सुनील शेळकेंनीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना मास्क काढून भाषण करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे पहिल्यांदाच अजित पवारांनी विना मास्क भाषण केलं. पण त्यावरुन आता अजितदादांना त्यांच्याच मास्कबद्दलच्या वक्तव्याचा विसर पडला का? असा सवाल विचारला जातोय.

मास्क काढून भाषणासाठी उभे राहिले

मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. अजित पवार यांचे भाषण सुरू होण्याआधी आमदार सुनील शेळके माईकजवळ येत दादा सगळे हट्ट पुरवले, आता फक्त मास्क काढून बोला, अशी विनंती त्यांनी केली अन् त्यांच्या विनंतीला मान देत अजित पवारदेखील मास्क काढून भाषणासाठी उभे राहिले. त्यामुळे उपस्थितांसाठी हा चर्चेचा विषय ठरलाय. रोज नवनवीन गोष्ट शिकायचा प्रयत्न केला पाहिजे, लाज वाटली नाही पाहिजे, शरद पवार 80 वर्षाचे झाले तरी ते नवीन काय गोष्ट असले तर तेसुद्धा पाहतात, असंही अजित पवार म्हणालेत.

‘यासारखं वाढदिवसाचं कुठलंच गिफ्ट असूच शकत नाही’

“रोज सूर्य उगवतो आणि मावळतो. पहिल्यांदा मावळामध्ये सूर्य उगवल्यानंतर मावळणार नाही, याची जाणीव होतेय. सुनील शेळकेंनी मला मोठं भाऊ केलंय. तर अजितदादांनी सामाजिक न्यायमंत्री केलंय. वडगाव मावळमध्ये 20 तारखेला सुनील अण्णांच्या तारखेला अजितदादांनी वेळ देणं हे साधंसोपं काम नाही. वाढदिवसाला वेळ देण्यापेक्षा या वडगाव मावळवर आणि सुनील अण्णांवर अजितदादा आणि पवारसाहेबांचं एवढं प्रेम आहे की, दोन वर्षात कितीही आर्थिक संकटं आली तरी वळगाव मावळमध्ये 756 कोटी रुपये विकासकामांसाठी दिले. यासारखं वाढदिवसाचं कुठलंच गिफ्ट असूच शकत नाही”, असं मत धनंजय मुंडेंनी मांडलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर निघाला मुहुर्त, महाविकास आघाडीचे नेते 1 सप्टेंबरला राज्यपालांना भेटणार!

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपचा खंबीर पाठींबा, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

News Desk

फडणवीसांनी ‘ओबीसीं’चे नेतृत्व करावे!

News Desk