HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

मी परळीसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार !

बीड | परळी नगर परिषदेच्यावतीने सर्वांसाठी घरे या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनांच्या सुभारंभाच्या प्रसंगी बोलतांना राज्यचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, “परळीच्या विकासासाठी मी जे स्वप्न पहिले आहे त्या दिशेने वाटचाल सुरु आहे.” त्याचप्रमाणे, महाराष्ट्र हाउसिंग सोसायटीच्यावतीने परळी शहर जवळपास ५,५०० घर नगरपालिका (बारामती पॅटर्न घरे) बांधून देणार असल्याचेही सांगण्यात आले. परळी नगर पालिका ही ब दर्जाची नगरपालिका आहे. मात्र, ही पालिका पहिलीच असेल जी असा उपक्रम राबवणार आहे.

“प्रधानमंत्री आवास योजनेच्यावतीने आज प्राथमिक स्वरूपाचे १० हजार रुपयांचा धनादेश देण्याचे काम परळी नगरपालिका करत असून अद्याप या योजनेचे केंद्रामार्फत बजेट आले नसून जेव्हाही ते येईल त्याचेही तत्काळ वाटप करण्यात येणार असल्याचे”, मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. परळीत कोळशावर चालणारे वीज निर्मिती प्रकल्प करू होतील की नाही ते माहीत नाही. मात्र सूर्य प्रकाशावर चालणार सोलर प्रकल्प हा परळीत शासकीय प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याचेही या प्रसंगी बोलतांना धनंजय मुंडे म्हणले.

रोजगाराचा मार्ग मोकळा होणार !

या प्रकल्पामुळे निश्चित रोजगाराचा मार्ग मोकळा होणार आहे. आज गेल्या २४ वर्षांत पहिल्यांदाच वाण धरण भरल्याने वाण धरणाचे आज जलपूजन करून पिण्याच्या पाण्याचा प्रश आज सुटला असून येत्या काही दिवसात परळीकरांना 24 तास पाणी मिळणार असल्याचेही या प्रसंगी धनंजय मुंडे म्हणाले.
या प्रसंगी पथविकत्रेत्यांना १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य म्हणून चेक वाटप करण्यात आले.

मी आपल्यासाठीच सदैव सेवेत आहे !

मंत्री धनंजय मुंडे पुढे असेही म्हणाले की, “मी याच वर्षी पहिल्यांदा हा असा कार्यक्रम घेत आहे कारण काही लोक म्हणत आहेत की मी कुठे आहे? पण मी आपल्यासाठीच सदैव सेवेत आहे. या वर्षी आपण काय कमावले ? तर मी म्हणेन की, आपण जीव कमावला.”

Related posts

अहेरी शहरातील सुसज्ज बाजारवाडीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

News Desk

तुळजापूरमधील मराठा क्रांती मोर्चा आयोजित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

News Desk

#Lockdown : १७ मेला लॉकडाऊन उठवला जाऊ शकतो, गृहमंत्र्यांचे संकेत

News Desk