नवी दिल्ली | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. देशातील महाराष्ट्रात कोरोनाबाधिकांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धव यांनी चिंता व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर यावर डॉ. हर्षवर्धव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
The situation in Maharashtra is certainly a matter of concern right now as 34 out of 36 districts are affected by #COVID19. I will hold a meeting with CM as well to discuss further course of action to control spread of the virus in state: Union Health Minister Dr Harsh Vardhan pic.twitter.com/g2Ez09pNLM
— ANI (@ANI) May 6, 2020
मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यात राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील. यासंदर्भात चर्चा झाली असून मुंबई, पुणे आणि नागपूर हे कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यापाठोपाठ राज्यातील ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची काल (५ मे) एकूण संख्या १५ हजार ५२५ झाली. तर काल ८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात काल ३५४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८१९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.