HW News Marathi
देश / विदेश

ICSE आणि ISC परिक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार!

मुंबई | ISCE आणि ISC परिक्षांच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. निकाल उद्या (24 जुलै) दुपारी तीन वाजता लागणार आहे. CISCE याबाबत पुष्टी केली आहे. १० वी आणि १२ वी परिक्षांच्या निकाल उद्या दुपारी तीन वाजता लावला जाईल, असं CISCE म्हटलं आहे. निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल, अंस सांगण्यात आलं आहे.

कुठे पाहता येणार निकाल?

निकाल पाहण्यासाठी वेबसाईट लिंक्स दिल्या गेल्या आहेत. ICSE आणि ISC चा निकाल वेबसाईट cisce.org आणि एसएमसच्या माध्यमातून पाहता येणार आहे. संबंधित शाळा प्रीन्सिपल लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून करिअर पोर्टलवर विद्यार्थ्यांचे निकाल पाहू शकतील. विद्यार्थ्यांना एसएमएसच्या माध्यमातून रिझल्ट पाहायचा असेल तर यूनिक आयडी नंबर 09248082883 वर पाठवावा ‘ICSE/ISC लागेल.

अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकाल जाहीर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने परीक्षा रद्द केल्या होत्या. जूनमध्ये सरकारने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय दिला आणि अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकाल जाहीर जाहीर करण्याचा निर्णय दिला होता. विद्यार्थ्यांना या मूल्यांकनाबाबत काही आक्षेप असल्यास त्यांना यासंदर्भातील अर्ज शाळेमध्ये पाठवता येईल. शाळा अशाप्रकारच्या अर्जांची पडताळणी करेल, शाळेला ते योग्य वाटल्यास अशाप्रकारची तक्रार पुढे CISCE कडे पाठवता येईल. 10 वीच्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारची विनंती asicse@cisce.org वर पाठवता येईल, तर 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी asisc@cisce.org विनंती करता येईल. CISCE च्या अधिकृत नोटिसमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्लू व्हेल’ गेमच्या अॅडमीनला अटक

News Desk

भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये १३० ते १७० दहशतवाद्यांचा खात्मा, विदेशी पत्रकाराचा दावा

News Desk

भगतसिंग यांच्या विषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

News Desk