HW News Marathi
महाराष्ट्र

…तर बाळासाहेबांनी एक थोबाडीत मारली असती!; चंद्रकांत पाटलांची राऊतांवर बोचरी टीका

नाशिक। शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण उभ्या महाराष्ट्राने पाहिले आणि आता देखील तसंच काहीस झाल आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य ऐकुण किव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल. बाळासाहेब जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत दिली असती, अशी टोकाची टीका आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये केली आहे.

नाशिकमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी पाटील आले होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्रिपुरा येथील घटनेवर महाराष्ट्रात उमटलेल्या पडसादावरून शिवसेनेला टार्गेट केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी रझा अकादमी हे भाजपचे पिल्लू आहे. त्यामुळे त्यांच्याच पाठिंब्याने त्रिपुरातलं लोण इथवर पोहोचलं आहे. अन्यथा तिकडे त्रिपुरात घडलेल्या दंगलींचे पडसाद इथे पडण्याचे काय कारण, असा सवाल केला होता. पाटील यांनी याच वक्तव्याचा समाचार घेत ते म्हणाले, संजय राऊत यांचे वक्तव्य ऐकुण किव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल. आज स्वर्गीय बाळासाहेब जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत मारली असती, अशी बोचरी टीका केली आहे.

तुम्ही तिघेही दुबळे आम्ही श्रेष्ठ आहोत

या नंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, तुम्हाला झोपताना, उठताना बीजेपी दिसते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आम्ही सुरू केला. आरोग्य पेपर आम्हीच फोडला. शेतकरी पैसे आम्ही थांबवले. अरे काय चेष्टा चाललीय. सामान्य माणसाला कळत नाही काय? सगळीकडे भाजपचा हात मग तुम्ही 3 पक्ष समर्थ आहात ना ? भाजपचा हात कापून काढा. तुम्हाला कोणी अडवलं आहे. तुम्ही तिघेही दुबळे आम्ही श्रेष्ठ आहोत. सरकारने हे थांबवण्याचा प्रयत्न केला, तर पद जातील. माजी गृहमंत्री जेलमध्ये आहे. एक गृहमंत्री आता आजारपणातून बाहेर पडले आहेत. मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत. बाहेरून सरकार चालवणारे मात्र आहेत ना, असा घणाघाती हल्ला देखील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक मध्ये बोलताना चढवला.

पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे

मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.तसंच, राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगावात पोस्टरचा धुमाकूळ, भाजप नेत्याच्या पोस्टरवर खडसेंचा फोटो

News Desk

शरद पवारांच्या ‘त्या’ भाष्यावर मी बोलू शकत नाही – संजय राठोड 

News Desk

‘गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र!’

News Desk