HW News Marathi
महाराष्ट्र

स्टेअरींग अजित पवारांकडे असलं तरी गाड्या आम्ही पुरवतो-संजय राऊत

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेअर केलेला फोटो राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. यात दोघेही एकाच गाडीत बसले आहेत. मात्र, गाडीचे स्टेअरिंग अजित पवारांच्या हातात आहे. दरम्यान, काल (२६ जुलै) सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. यात, मुख्यंमंत्र्यांनी सरकार तीन चाकी असले तरी स्टेअरिंग माझ्यात हातात आहे, असे म्हटले होते, मात्र, अजित पवारांनी हा फोटो शेअर करत चर्चांना उधाण आले आहे. यावर शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रीया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, “ मी तो फोटो पाहिला, आणि स्टेअरिंग त्यांच्या हातात असले तरी गाड्या पुरवायचे काम आम्ही करतोय. त्यांचा स्टेअरिंगचा अनुभव चांगला आहे, हे आपण पाहिलं असेल. आणि अजित पवार हे सुद्धा महाविकास आघाडीची गाडी मजबूतीने आणि वेगाने धावावी यासाठी अधून मधून ऑईल पाणी करत असतात. ते स्वत: ती गाडी कशी चालतेय ते पाहत आहेत. आणि माझ्या अजित पवारांनाही शुभेच्छा आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या दौऱ्यात बदल, कोल्हापूरऐवजी सांगलीला झाले रवाना

News Desk

राज ठाकरे ‘या’ कारणासाठी शरद पवारांना भेटणार

News Desk

मुंबई महानगरपालिकेचे आज बजेट सादर होणार

News Desk